जळगाव: सध्या सोशल मीडियावर एका पोलिसाच्या जबरदस्त आवाजातील गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या या सुरेल पोलिसानं सगळ्यांनाच भुरळ घातली. पण खरंच या पोलिसाचा आवाज इतका अप्रतिम आहे का? हेच शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

आम्ही जळगाव जिल्ह्यातल्या वाकोद गावात पोहोचलो. त्या आवाजामागचा चेहरा आम्हाला सापडला. तो याच गावात.

संघपाल तायडे सध्या जळगाव पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या गायकीच्या जोरावर केवळ पोलीस दलातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात आपल्या आवाजाची छाप उमटवली आहे.

2008 मध्ये पोलीस खात्यात रुजू झालेल्या संघपालला गाण्याची प्रचंड आवड.

एका निवांत क्षणी त्यांच्या गाण्याची एक क्लिप तयार करुन त्यांच्या मित्राने ती सोशल मीडियावर व्हायरल केली. त्या क्लिपला अल्पावधीत दहा लाखांहून अधिक हिट्स मिळाल्या.  तेव्हापासूनच संघपाल यांच्या आवाजाला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.

एका दिवसात संघपाल सोशल मीडियावर हिट झाले आणि त्यांना भेटण्यासाठी, अभिप्राय देण्यासाठी रांगा लागल्या... इतक्या... की वरिष्ठही त्याच्या आवाजावर फिदा झाले.

ना कोणताही गुरु... ना संगीताचं शिक्षण... जे कानावर पडेल... ते आत्मसात करायचं... त्यांची हीच कला... मित्रांनी हेरली... आणि संघपाल बनला गायक.

बरं संघपालच्या कलेची कीर्ती त्याच्या घरात मात्र कुणालाच नाहीत नाही.

प्रत्येक माणसात काही ना काही कला असतेच. फक्त त्याला संधी मिळण्याची गरज असते... सोशल मीडिया त्यासाठीचा उत्तम मंच झाला आहे... ज्यानं अशा कलाकारांना उजेडात आणलं.



VIDEO: