सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विजयदुर्गच्या समुद्रात तब्बल 700 किलोचा मासा आढळल्यानं आश्चर्य व्यक्त होतं आहे. मच्छीमार मुनीर मुजावर यांच्या जाळ्यात हा मासा सापडला आहे. तब्बल 20 फूट लांबीचा हा मासा आहे.
या माशाचे तोंड पातीसारखे असून त्याला काटेरी सुळेदेखील आहेत. ‘सॉफिश’ असं या माशाला म्हटलं जातं. किनाऱ्यावर आणल्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. जाळ्यामुळे माशाच्या शरीरावर जखमा झाल्यानं त्यातच त्याचा मृत्यू झाला.
विजयदुर्ग इथल्या खोल समुद्रात हा मासा आढळला होता. असा मासा फारसा पाहायला मिळत नाही. त्यामुळेच हा मासा पाहण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती. दरम्यान, अनेक जणांनी या माशासोबत सेल्फीही काढला. दरम्यान, याआधीही कोकणच्या मच्छिमारांच्या जाळ्यात असे अनेक मासे सापडले आहेत.