औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रालयामध्ये वीर पांढरा वाघ आणि भक्ती पिवळी वाघीण या जोडीपासून 3 मार्च 2021 रोजी या भक्ती वाघिणीने दिलेल्या दोन पांढऱ्या बछड्यापैकी एका बछड्याचा दिनांक 10 एप्रिल 2021 रोजी सकाळी आठ वाजता मृत्यू झाला. तर 14 मार्चला रात्री आणखी एका बछड्याची प्रकृती खालावली कर्मचाऱ्यांनी बकरीचे दूध देऊन त्याबद्दल त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना अपयश आलं.
सिद्धार्थ उद्यानातील या भक्ती वाघिणीची बछडे देण्याची ही पहिलीच वेळ होती. बछड्यांना जन्म दिल्यानंतर भक्ती वाघिणीमध्ये मातृत्वाची भावना दिसून आली नाही. त्यामुळे भक्ती वाघीण ही पिलांची काळजी घेत नव्हती. तसेच स्वतः दूध पाजत नव्हती. त्यामुळे बछड्यांना ठराविक अंतराने बकरीचे दुध पाजण्यात येत होते. दरम्यान 6 एप्रिल 2021 रोजी रात्री भक्ती वाघीण पिंजऱ्यामध्ये फिरत असताना या बछड्यावर तिचा पाय पडला होता त्यामुळे पिल्लांना वेदना झाल्या त्यात सदर बछडा दूध कमी पीत होता. कालांतराने बछड्याने दूध पिणे बंद केले. दोन्ही बछड्यांना आई पासून वेगळे करून दुसऱ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. पाय पडलेल्या बछडयावर प्राणिसंग्रहालयाचे पशुवैद्यक डॉक्टर नितीन सिंग यांच्यामार्फत उपचार करण्यात आले परंतु बछड्याने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने शनिवार 10 एप्रिल 2021 रोजी सकाळी आठ वाजता बछड्याचा मृत्यू झाला.
या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार पहिल्या बछड्याचा मृत्यू वाघाच्या बछड्याच्या शरीरात रक्तस्राव झाल्याने बछड्याचा झाल्याचे निष्पन्न झाले. दुसऱ्या बछड्याचा शवविच्छेदन अहवाल अजून येणे बाकी असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार यांनी दिली.