भंडारा : विदर्भातील नेते नालायक आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रातील नेते कुठे लायक आहेत? असा सवाल राज्याचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी केला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर इथे अणेंची जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांवर टीकेचे झोड उठवली.


 

एवढच नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अणेंनी त्यांनी चिमटा काढला. फडणवीस मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्याचं सांगतात, पण त्यांनी आपण विदर्भाचे मुख्यमंत्री असल्याचंही विसरु नये, असा सल्ला दिला.

 

गेल्या काही दिवसात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवरुन श्रीहरी अणे आंदोलन करत आहेत. आता त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांवर टीका केल्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याची अद्याप अणेंच्या टीकेवर प्रतिक्रिया आलेली नाही.