Shravan Somvar Vrat 2022 : आज श्रावणातील पहिला सोमवार; राज्यभरातील मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी, वाचा अपडेट एका क्लिकवर

Shravan Somvar Vrat 2022 : आज श्रावण (Shravan 2022) महिन्यातला पहिला सोमवार.. यामुळे भाविकांनी राज्यभरातील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच गर्दी केलीय. राज्यभरातील अपडेट वाचा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Aug 2022 03:39 PM

पार्श्वभूमी

Shravan Somvar Vrat 2022 : आनंदाचा, उल्हासाचा, भक्तीचा श्रावण महिना सुरु झाला आहे. आज श्रावण (Shravan 2022) महिन्यातला पहिलाच सोमवार आहे. श्रावणातले सोमवार हे विशेष महत्वाचे समजले जातात. श्रावणातल्या सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी...More

Nagpur : पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त भाविकांची मांदियाळी

नागपूरः पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त नागपुरातील शिव मंदिरात भाविकांची गर्दी आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे प्रार्थनास्थळांवरही निर्बंध असल्यामुळे भाविकांना मंदिरात दर्शन घेता आले नाही. मात्र यंदा कोरोनाची लाट ओसरल्याने महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांमध्येही उत्साह आहे. शहरातील  महाल येथील कल्याणेश्वर मंदिर, फुटाळा येथील तेलंगखेडी शिवमंदिर, सुराबर्डी येथील शिवमंदिर आणि मानकापूर येथील प्राचीन शिवमंदिरात भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.