रायगड :  रायगड जिल्ह्यातील महाड येथील एमआयडीसीतील प्रिव्ही ऑरगॅनिक लिमिटेड कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) कारणे दाखवा नोटीस दिली आहे. यामध्ये, नियमांचे उल्लंघन करून कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली नसल्याने कंपनीला नोटीस देण्यात आली आहे. प्रदूषणाविरोधात युवासेना जिल्हा अधिकारी विकास गोगावले यांनी केलेल्या तक्रारीची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखल घेण्यात आली आहे.


महाड एमआयडीसीतील प्रिव्ही ऑरगॅनिक लिमिटेड कंपनी ही प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळत नसल्याची तक्रार युवासेनेचे जिल्हा अधिकारी विकास गोगावले यांनी केली होती. यामध्ये, स्थानिक प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत घातलेल्या नियमांचे उल्लंघन कंपनीमार्फत करण्यात आल्याची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाला करण्यात आली होती. यामध्ये, घातक घनकचऱ्याची विल्हेवाट ही नियमानुसार करण्यात आली नसल्याने या प्रदूषणाचा त्रास हा स्थानिक रहिवासी आणि मजुरांना होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. 


यामुळे, या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कंपनीची पाहणी केली असता सुमारे 123 मेट्रिक टन घातक कचऱ्याची निर्मिती करण्यात आली होती. तर, या  कचऱ्याची नियमानुसार विल्हेवाट लावली नसल्याची समोर आले होते. यामुळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जल प्रदूषण प्रतिबंध कलम 1974 आणि वायू प्रदूषण प्रतिबंध कायदा 1981 नुसार कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 


या प्रदूषणामुळे स्थानिक रहिवासी आणि इतर मजुरांना त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. यामुळे या परिसरातील लोकांच्या आरोग्याला धोका असल्याचंही या तक्रारीत म्हटलं होतं. 


महत्त्वाच्या बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 


ABP Majha