Prajakt Tanpure : महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर लाडक्या बहिणी प्रमाणेच लाडक्या दाजींचांही विचार करा. लाडक्या दाजींना दिवसा वीज कशी मिळेल यावर निर्णय घ्या असे वक्तव्य माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा राहुरी शहरात दाखल झाली आहे. यावेळी राहुरीत आयोजीत कार्यक्रमात तनपुरे बोलत होते. भाच्याच्या प्रचासाठी मामा मतदारसंघात आले आहेत. जयंत पाटील (Jayant Patil) हे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे भाचे आहेत. 


निळवंडेचे पाणी राहुरी तालुक्यात आले, याचं श्रेय फक्त जयंत पाटलांना


पंजाबराव डख यांना फोन करून पावसाबाबात विचारलं होतं. त्यांनी सांगितलं की 27 ला पाऊस आहे. म्हणून ही सभा कार्यालयात घेत आहे. नाहीतर प्रत्येक वेळी घेतो त्या नवी पेठेतच सभा झाली असती असेही तनपुरे म्हणाले. जयंत पाटील यांची यापूर्वी पाच वर्षांपूर्वी सभा झाली होती. पाच वर्षे कशी गेली हे कळलं सुद्धा नाही. या पाच वर्षात मतदारसंघाचा विकास हे एकमेव लक्ष ठेवून काम केल्याचे तनपुरे म्हणाले. पहिल्यांदा आमदार झाल्यावर राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी शरद पवार साहेबांनी दिली. राहुरी तालुक्यातील अनेक गावांना पाणी देण्याचे काम जयंत पाटलांनी केले. तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील खूप मदत केल्याचे तनपुरे म्हणाले.  काही लोक म्हणायचे निळवंडेचे पाणी आणू शकलो नाही तर मते मागायला येणार नाही. मात्र महाविकास आघाडीचे सरकार असताना जयंत पाटील यांनी कालव्यांच्या कामांना 1200 कोटी दिले. राहुरी तालुक्यात निळवंडेचे पाणी आले, याचे श्रेय फक्त जयंत पाटलांना असल्याचे तनपुरे म्हणाले. 


विधानसभेला घराघरात आपलं चिन्ह पोहोचलच पाहिजे


महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर लाडक्या बहिणी प्रमाणेच लाडक्या दाजींचांही विचार करा. लाडक्या दाजींना दिवसा वीज कशी मिळेल यावर निर्णय घ्या असे तनपुरे म्हणाले. शिर्डीतील सरकारच्या कार्यक्रमासाठी आज एसटीचा वापर केला. अनेक विद्यार्थ्यांना एसटीच मिळाली नाही असेही ते म्हणाले. आज झालेले पक्ष प्रवेश हा ट्रेलर आहे.. पिक्चर तो अभी बाकी है असंही तनपुरे म्हणाले. दरम्यान, लोकसभेला नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायला थोडी अडचण आणि उशीर झाला. मात्र आता विधानसभेला घराघरात आपलं चिन्ह पोहोचलच पाहिजे. असे तनपुरे म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Narhari Zirwal : जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं, नरहरी झिरवाळांचा मोठा गौप्यस्फोट