यवतमाळ: सत्तेचा माज शिवसेना कार्यकर्ते आणि नेत्यांच्या नसानसात भिनल्याचं सध्या पाहायला  मिळत आहे. शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदेनं सेंट्रल बँकेच्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात भडकावल्याची घटना घडली आहे.

 

एका शेतकऱ्यानं पीक कर्जाची मागणी केली होती. मात्र पीक कर्ज मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यानं पैसे मागितल्याचा आरोप आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे आपल्या कार्यकर्त्यासह बँकेत पोहोचला. मात्र, संबंधित अधिकारी उपस्थित नसतानाही त्यानं तिथल्या एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात भडकावली.

 

त्यामुळं शेतकऱ्याच्या नावाखाली शिवसेनेची गुंडागर्दी का खपवून घ्यायची? असा सवाल विचारला जातो आहे.

 
'काही वेळा कार्यकर्त्यांचा संयमाचा बांध सुटतो, पण तरीही प्रवीण शिंदेने अशी मारहाण करणं योग्य नाही. मी मारहाणीचं समर्थन करीत नाही. पण बँकेच्या कारभारामुळे शेतकरी वैतागले आहेत. पण कार्यकर्त्यांकडून असं टोकाचं पाऊल उचललं जातं.'
अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी दिली.