मुंबई : कल्याणमध्ये शिवजयंतीमधील देखाव्यावरुन शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे. कल्याणमध्ये तिथीनुसार शिवजयंतीच्या निमित्तानं शिवसेनेतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिवजयंतीची मिरवणूक म्हणून ओळखली जाते. मात्र यंदाच्या वर्षी या मिरवणुकीतल्या एका देखाव्यावरून शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये वाद झाले.
या मिरवणुकीतल्या एका देखाव्यातून पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेल्या एयर स्ट्राईकवरून सरकारला लक्ष्य करण्यात आलं. सरकारनं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानला दहशत बसलेली नाही, त्यामुळे एकदाच पाकिस्तानला बेचिराख करण्याची मागणी शिवसेनेनं केली.
मात्र पोलिसांनी हा देखावा मिरवणुकीतून बाहेर काढण्यास सांगितलं. त्यामुळं पोलीस आणि शिवसैनिक यांच्यात वाद झाला. मात्र पोलिसांनी नंतर परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कडेकोट बंदोबस्तात हा देखावा पुढे मार्गस्थ झाला. दरम्यान, महाराष्ट्रातल्या या सगळ्यात मोठ्या मिरवणुकीत जवळपास १० हजार लोक सहभागी झाले होते. मिरवणुकीतले देखावे, आदिवासी नृत्य, ढोलताशा पथकं, साहसी खेळ पाहण्यासाठी कल्याणकरांनी मोठी गर्दी केली होती.
कल्याणमध्ये शिवसेनेचा 'शिवकालीन सर्जिकल स्ट्राईक', देखावा मागे घेण्यावरून सेना-पोलिसांमध्ये वाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Mar 2019 09:48 PM (IST)
कल्याणमध्ये शिवजयंतीमधील देखाव्यावरुन शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे. कल्याणमध्ये तिथीनुसार शिवजयंतीच्या निमित्तानं शिवसेनेतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिवजयंतीची मिरवणूक म्हणून ओळखली जाते. मात्र यंदाच्या वर्षी या मिरवणुकीतल्या एका देखाव्यावरून शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये वाद झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -