चंद्रपूर : संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या भद्रावती नगर परिषदेवर नगराध्यक्ष पदासह पूर्ण बहुमत मिळवत शिवसेनेने पुन्हा एकदा भगवा फडकावला. गेल्या 20 वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेला पुन्हा एकदा मतदारांनी भरभरून मतदान केलं.
27 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने 16 जागा मिळवत पूर्ण बहुमत प्राप्त केलं. तर सत्ता मिळवण्याच्या ईर्ष्येने पूर्ण ताकतीने उतरलेल्या भाजपला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र शिवसेनेने सलग पाचव्यांदा इथे हे यश मिळवलं.
नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवसेनेचे उमेदवार अनिल धानोरकर यांनी भाजपच्या सुनील नामोजवर यांना 3616 अशा भरघोस मतांनी पराभूत केलं. भद्रावती नगरपरिषदेची निवडणूक ही केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर आणि शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी प्रतिष्ठेची केली होती. ज्यामध्ये आमदार धानोरकर यांची सरशी झाली.
पक्षीय बलाबल
शिवसेना 16
भाजप 4
काँग्रेस 2
भारिप बमसं 4
अपक्ष 1
बहुसंख्येने नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष जागा जिंकून आणत शिवसेनेने इतिहास रचला आहे. सलग पाचव्यांदा शिवसेनेने भद्रावती नगर पालिकेवर भगवा फडकवला. भद्रावतीकर नागरिकांसाठी सातत्याने कार्यरत असल्याने शिवसेना यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी दिली.
भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा सलग पाचव्यांदा भगवा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2018 06:46 PM (IST)
सत्ता मिळवण्याच्या ईर्ष्येने पूर्ण ताकतीने उतरलेल्या भाजपला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवसेनेचे उमेदवार अनिल धानोरकर यांनी भाजपच्या सुनील नामोजवर यांना 3616 अशा भरघोस मतांनी पराभूत केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -