मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Local Body Election) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी तयार झाली आहे. ही यादी 40 नावांची असून त्यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव, आदेश बांदेकर, सुषमा अंधारे, किरण माने (Kiran Mane) आणि शरद कोळी (Sharad Koli) यांच्या नावाचाही समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे, या यादीत खासदार संजय राऊत यांचेदेखील नाव आहे. पण ते सध्या तब्येतीच्या कारणास्तव उपचार घेत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाने 40 शिलेदारांच्या नावाची यादी राज्य निवडणूक आयोगाला सादर केली आहे. हे 40 शिलेदार राज्य पिंजून काढणार असून सेनेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असतील.
Star Campaigners of Shivsena Thackeray : ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी
1. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray)
2. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)
3. सुभाष देसाई (Subhash Desai)
4. संजय राऊत (Sanjay Raut)
5. अनंत गीते (Anant Geete)
6. चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)
7. अरविंद सावंत (Arvind Sawant)
8. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)
9. अनिल देसाई (Anil Desai)
10. विनायक राऊत (Vinayak Raut)
11. अनिल परब (Anil Parab)
12. राजन विचारे (Rajan Vichare)
13. सुनील प्रभू (Sunil Prabhu)
14. आदेश बांदेकर (Adesh Bandekar)
15. वरुण सरदेसाई (Varun Sardesai)
16. अंबादास दानवे (Ambadas Danve)
17. रवींद्र मिर्लेकर (Ravindra Mirlekar)
18. विशाखा राऊत (Vishakha Raut)
19. नितीन बनूगडे पाटील (Nitin Banugade Patil)
20. राजकुमार बाफना (Rajkumar Bafna)
21. प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi)
22. सचिन अहिर (Sachin Ahir)
23. मनोज जामसुतकर (Manoj Jamsutkar)
24. सुषमा अंधारे (Sushama Andhare)
25. संजय (बंडू) जाधव (Sanjay Jadhav)
26. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar)
27. ज्योती ठाकरे (Jyoti Thakare)
28. शीतल शेठ–देवरूखकर (Sheetal Sheth Devrukhkar)
29. जान्हवी सावंत (Janhavi Sawant)
30. शरद कोळी (Sharad Koli)
31. ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar)
32. सुनील शिंदे (Sunil Shinde)
33. वैभव नाईक (Vaibhav Naik)
34. नितीन देशमुख (Nitin Deshmukh)
35. आनंद दुबे (Anand Dube)
36. किरण माने (Kiran Mane)
37. अशोक तिवारी (Ashok Tiwari)
38. प्रियांका जोशी (Priyanka Joshi)
39. सचिन साठे (Sachin Sathe)
40. लक्ष्मण वाडले (Laxman Wadle)
Maharashtra Elections : स्टार प्रचारकांची संख्या वाढवली
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने 20 वरून 40 केली आहे. तशी मागणी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाकडे केली होती.
‘महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी, विनियमन आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, 2025’ मधील परिच्छेद 26 मध्ये प्रमुख प्रचारकांसंदर्भातील तपशील नमूद केला आहे. त्यातील तरतुदींच्या आधारे आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही संख्या वाढविण्यात आली आहे. राजकीय पक्षांना प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागेल.