मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नार्को टेस्ट करा (Narco Test) अशी मागणी आता पुढे येत आहे. भारतात गुन्हे तपासामध्ये नार्को टेस्ट हा शब्द नेहमीच चर्चेत असतो. अनेक संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये माहिती मिळवण्यासाठी नार्को टेस्टची मागणी केली जाते. मात्र नार्को टेस्ट म्हणजे नेमकं काय, ती कशी केली जाते, ती किती विश्वासार्ह आहे आणि भारतात तिचे काय नियम आहेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
What Is Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय?
नार्को टेस्ट किंवा Narco Analysis ही एक विशेष तपास पद्धत आहे. त्यामध्ये ज्याची नार्को टेस्ट करायची आहे त्याला सोडियम पेंटोथल (Sodium Pentothal) सारखे औषध देऊन अर्ध-बेशुद्ध (semi conscious) अवस्थेत नेलं जातं. या स्थितीत व्यक्तीचं मेंदूवरील नियंत्रण थोडे शिथील होते, प्रतिकारशक्ती कमी होते आणि लपवलेली माहिती समोर येण्याची शक्यता वाढते. मात्र, ही पद्धत वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे विश्वासार्ह नाही आणि केवळ तपासासाठी दिशादर्शक ठरते असं तज्ज्ञांचं मत आहे.
Sodium Pentothal, यालाच ट्रूथ सीरम (Truth Serum) म्हणून ओळखले जाते. एखाद्या व्यक्तीला ते दिल्यामुळे ती व्यक्ती शांत, झोपाळू आणि अर्ध-बेशुद्ध अवस्थेत जाते. तर नार्को टेस्ट प्रक्रियेला Thiopentone Sodium आणि Sodium Amytal ही पर्यायी केमिकल्स वापरली जाऊ शकतात.
Narco Test Standard Protocol : नार्को टेस्टची प्रक्रिया कशी असते?
1. वैद्यकीय तपासणी
व्यक्तीचे आरोग्य या प्रक्रियेस योग्य आहे का ते तपासले जाते. ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या स्थिर असावी. तसेच त्या व्यक्तीला या टेस्टमधील रिस्कबद्दल लिखित माहिती देणे आवश्यक आहे.
2. संमती
ही टेस्ट करण्यासाठी त्या व्यक्तीची लिखित संमती आवश्यक असते. टेस्टची जबरदस्ती करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
3. औषधाचे इंजेक्शन
ही टेस्ट संपूर्णपणे नियंत्रित वातावरणात, हॉस्पिटल किंवा फॉरेन्सिक लॅबमध्ये घेतली जाते. संबंधिताला IV द्वारे औषध दिले जाते आणि व्यक्ती हळूहळू ट्रान्स अवस्थेत जाते.
4. प्रश्नोत्तर सत्र
मानसोपचारतज्ज्ञ, डॉक्टर, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि पोलीस यावेळी उपस्थित राहतात. संपूर्ण प्रक्रिया व्हिडीओ रेकॉर्ड केली जाते.
5. शुद्धीवर आणणे
औषधाचा परिणाम कमी झाल्यानंतर व्यक्ती शुद्धीवर येते.
Narco Test Process : नार्को टेस्ट विश्वासार्ह आहे का?
अनेक मोठ्या प्रकरणात नार्को टेस्टची मागणी केली जाते. ही टेस्ट केल्यामुळे सगळी खरी माहिती समोर येईल अशी आपली समजूत असते. अनेकदा बॉलिवूड चित्रपटातही तसंच काहीसं दृश्य दाखवलं जातं. पण तज्ज्ञांच्या मते, ही प्रक्रिया 100 टक्के विश्वासार्ह नाही. याची विश्वासार्हता मर्यादित आहे. या टेस्टची माहिती फक्त तपासाला दिशा देण्यासाठी वापरली जाऊ शकते.
Narco Test India : नार्को टेस्ट 100 टक्के विश्वासार्ह का नाही?
- या टेस्टवेळी संबंधित व्यक्ती व्यक्तीला स्वप्न आणि वास्तव यातील फरक करता येत नसल्याने ती गोंधळू शकते.
- मनातील कल्पना आणि आठवणी यांचे मिश्रण होऊन त्या बाहेर येऊ शकतात.
- त्यामुळे 100 टक्के सत्य बाहेर येईल याची खात्री नसते.
- कोर्टात ही माहिती थेट पुरावा म्हणून मान्य नाही.
Narco Test Rules : भारतामध्ये नार्को टेस्टचे नियम काय?
नार्को टेस्ट संबंधी 2010 साली Selvi vs State of Karnataka या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला. त्यानुसार नार्को टेस्ट फक्त कोर्टाच्या आदेशानेच करता येते. तसेच ही टेस्ट करण्यासाठी संबंधित व्यक्तीची लिखित संमती आवश्यक आहे. या टेस्टसाठी संबंधितावर जबरदस्ती करता येणार नाही. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या (NHRC) सर्व वैद्यकीय आणि सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. याशिवाय जर भारतात नार्को टेस्ट करणे संपूर्णपणे गैरकायदेशीर आहे.
Narco Test India List : भारतात या आधी कोणत्या केसमध्ये नार्को टेस्ट झाल्या?
- अब्दुल करीम तेलगी – स्टॅम्प पेपर घोटाळा (Abdul Karim Telgi – Stamp Paper Scam)
- अबू सालेम – 1993 मुंबई बॉम्बस्फोट (Abu Salem – 1993 Mumbai Bomb Blast)
- निठारी हत्याकांड – मोनिंदर पंधेर, सुरेंद्र कोली (Nithari Killings – Moninder Pandher, Surendra Koli)
- इंद्राणी मुखर्जी – शीना बोरा मर्डर केस (Indrani Mukerjea – Sheena Bora Murder Case)
- आरुषी तलवार हत्या – अनेक आरोपी (Aarushi Talwar Murder Case – Multiple Accused)
- 26/11 मुंबई दहशतवादी अजमल कसाब (Ajmal Kasab – 26/11 Mumbai Attack)
- मालेगाव ब्लास्ट – काही संशयित (Malegaon Blast – Suspects)
- बंगळुरू लेक मर्डर केस (Bengaluru Lake Murder Case)
- सत्यसाई बाबा ट्रस्ट तपास प्रकरण (Sathya Sai Trust Investigation)
नार्को टेस्टमधून समोर आलेली माहिती ही फक्त तपासाला दिशा मिळवण्यासाठी उपयुक्त असते. ती पुरावा म्हणून विश्वासार्ह नाही. तरीही काही गुंतागुंतीच्या तपासात नार्को विश्लेषणाने पोलfसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.
ही बातमी वाचा :