मुंबई : ठाकरे गटाला (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केलाय. खोके सरकार विरोधात आम्ही मशाल पेटवलीय, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. "अभिमानाने हे नाव आणि चिन्ह देशात आणि राज्यात घेऊन जाणार ओहोत. आमच्या नावात बाळासाहेब नाव आहे. धगधगती मशाल लोकापर्यंत पोहचविणार आहे. पण नाव आणि चिन्ह चोरण्याचं काम काही जण करतायत, अशी घणाघाती टीका आदित्य टाकरे यांनी शिंदे गटावर केलीय.
आदित्य ठाकरे म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर मशाल आहे, हुतात्मा चौकात धगधगती मशाल आहे. तीच मशाल घरोघरी पोहोवू. शिवाय धनुष्यबाणाची लढाई आम्ही पुढे कशी लढायची ती लढू. खोके सरकार म्हणून त्यांची ओळख आहे. खोके सरकार विरोधात आम्ही आता मशाल पेटवली आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
नवं चिन्ह मिळाल्यानंतर यश शिवसेनेच्याच बाजुने मिळेल असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ही मशाल घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ, यश शिवसेनेच्या बाजूनेच मिळेल. 40 लोकांची जी गद्दारी झाली आहे, त्यांचं पुढे काय होणार? कारण हा प्रश्न आता देशाचा झाला आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, कुठलेही नाव घेण्याचा प्रयत्न करा, पण खोके सरकार 50 खोके एकदम ओके हे सर्वांना माहिती आहे.
उद्धव ठाकरे गटाला ' शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर आता राज्यभरातील शिवसैनिक मशाली पेटवून आनंदोत्सव साजरा करत आहेत.
महत्वाच्या बातम्या