Rupali Patil Thombare News: उपमुख्यमंत्री अजित पवार (NCP Ajit Pawar) यांनी पक्षातील रूपाली पाटील ठोंबरे पाटील (Rupali Patil Thombare) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना चांगलाच दणका दिला. नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून अजित पवारांनी रूपाली पाटील ठोंबरे आणि आमदार अमोल मिटकरींना वगळण्यात आलं आहे. वारंवार पक्षविरोधी विधानं केल्यानं ठोंबरेंना डच्चू दिल्याचं बोललं जातंय. तर भाजपवर आगपाखड करणाऱ्या अमोल मिटकरींना अजितदादांनी पदावरून पायउतार केल्याची चर्चा आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याविरोधात रूपाली पाटलांनी रान पेटवलं होतं, असं असताना शनिवारी रूपाली पाटलांनी अजित पवारांची भेट घेऊन स्पष्टीकरण देखील दिलं होतं. मात्र अजित पवारांनी ठोंबरेंचं डिमोशन केलंय. तर मारहाण प्रकरणात वादात सापडलेल्या सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना प्रवक्तेपद दिलंय. मारहाण प्रकरणानंतर चव्हाणांचं पद काढलं होतं. आता पुन्हा एकदा प्रदेश प्रवक्त्यांच्या यादीत त्यांना संधी मिळाली आहे. 

Continues below advertisement

फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणावरुन रुपाली ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी आपल्याच पक्षाच्या रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवार यांचीही भेट घेतली होती. ही भेट होऊन काही तास उलटत नाही तोच रुपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कारवाईनंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

रुपाली पाटील ठोंबरे फेसबुक पोस्ट करत काय म्हणाल्या? (Rupali Patil Thombare News)

नमस्कार जय महाराष्ट्र...मी आज पुण्याच्या बाहेर आहे,प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही. आज पक्षाने नव्याने प्रवक्त्याची नेमणूक केली आहे. त्यात माझ्यासह आमदार अमोल मिटकरी, वैशालीताई नागवडे यांची नावे नाहीत. आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाणार सज्ज आहोत. पक्षाचे काम जोमाने करणार आहोत.या यादी बद्दल अजित पवारांना भेटून बोलून या विषयी माहिती घेईल मग आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेल, असं रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या.

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नव्याने प्रवक्ते नियुक्त, कोणाला संधी? (NCP Ajit Pawar New Spokesperson)

    1. अनिल पाटील
    2. रुपाली चाकणकर
    3. ब्रिजमोहन श्रीवास्तव
    4. चेतन तुपे
    5. आनंद परांजपे
    6. अविनाश आदिक
    7. सना मलिक
    8. राजलक्ष्मी भोसले
    9. सुरज चव्हाण
    10. हेमलता पाटील
    11. प्रतिभा शिंदे
    12. विकास पासलकर
    13. राजीव साबळे
    14. प्रशांत पवार
    15. श्याम सनेर
    16. सायली दळवी
    17. शशिकांत तरंगे

संबंधित बातमी:

Amol Mitkari and Rupali Patil Thombare News: रुपाली पाटील ठोंबरे अन् अमोल मिटकरींची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी; अजित पवारांचा मोठा निर्णय, नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर!