मुंबई: अजित पवारांनी जे आज काही वक्तव्य केलं ते फूलस्टॉप नसून कॉमा आहे, यापुढे अजूनही काहीही होऊ शकतं असं राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाने नेते उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तर शुगर वाढल्याने हे ऑपरेशन तूर्तास पुढे ढकललं गेलं असल्याचं सूचक वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी केलं आहे. 


राज्यात सत्तांतर वगैरे काहीही होणार नाही, आपण राष्ट्रवादीतच असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तरीही त्यावरुन होणाऱ्या चर्चा काही थांबायच्या नाव घेत नाहीत. आता त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीत अजित पवार यांची गळचेपी होत आहे. येत्या काही दिवसात या गोष्टी घडतील. वज्रमूठ आहे की सैल झालेली मूठ आहे हे सर्वांनी पाहिलं आहे. अजित दादांनी आज अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत. त्यांचा योग्य तो मानपान केला जाईल. शुगर वाढल्यामुळे ऑपरेशन पुढे ढकललं गेलं आहे. सामनामधून संजय राऊत यांनी लिहिलं पण अजित पवार यांनी खंडन नाही केलं. अजितदादा नाराज आहेत हे स्पष्ट होत आहे. आज अजित दादांची 'झाकली मूठ सव्वा लाखाची' आहे.


फूलस्टॅाप नसून कॅामा आहे, उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य


राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, चर्चांना पुर्णविराम द्यायचा असला तरी याची सुरुवात आता झालेली आहे. अजित पवारांनी आमची भूमिका मान्य करावी. जर ही भूमिका मान्य असेल तर त्याचं काय करायचं हे आमचे वरिष्ठ ठरवतील. अजित दादांचे आज जे काही वक्तव्य आहे ते माझ्यासाठी फूलस्टॅाप नसून कॅामा आहे. यापुढे अजूनही काहीही घडू शकतं.


गेल्या काही दिवसांत राज्यात जे काही वातावरण आहे, कोण गायब आहे, कुणाचे फोण ॲाफ आहेत या सगळ्यावरुन लक्ष हटवण्यासाठी अजित पवार महाराष्ट्र भूषणाचा विषय घेत आहेत असंही उदय सामंत म्हणाले.  


विनोद तावडे समितीच्या अहवालानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यात ऑपरेशन लोटस सुरू केल्याच्या चर्चा आहेत. 


ही बातमी वाचा: