रत्नागिरी: खंबाटा प्रकरणी शिवसेने सौदेबाजी केली आणि शाखाप्रमुखांना खंबाटाकडून पगार येतात. असा आरोप केल्यानंतर आता शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

‘देवेंद्र फडणवीस यांच्या ज्ञानाची आणि त्यांनी केलेल्या आरोपाची मला कीव येते.’ मुख्यमंत्र्यांनी कोणतीही खात्री न करता आरोप केल्याचा दावा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ते आज रत्नागिरीत एबीपी माझाशी बोलत होते.
‘जर एकाही शाखाप्रमुखाला पगार मिळत असेल हे सिद्ध झालं तर शिवसेना याचं प्रायश्चित घेण्यास तयार आहे. पण जर हे आरोप सिद्ध झालं नाही तर तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का?’ असा सवाल राऊत यांनी विचारला.

विनायक राऊत, शिवसेना खासदार

‘खंबाटा कंपनीत शिवसेनेसोबत भाजपचीही युनियन होती. तुमच्याच पक्षाचा  आमदार त्या कंपनीत युनियन चालवतात. मग त्यांनीही तिथं सौदेबाजी केली का?’ असा म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

खंबाटा एव्हिएशनला सध्या घरघर लागली आहे. मुंबई विमानतळावर ग्राउंड हँडलिंगचं काम करणाऱ्या या कंपनीच्या २४०० कामगारांना गेल्या वर्षभरापासून पगारच मिळालेला नाही. याप्रकरणी शिवसेनेनं आवाज उठवला होता. मात्र, आता त्यात सौदेबाजी झाल्याचा आरोप होतो आहे.

दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांनी साकीनाका येथील प्रचार सभेत खंबाटा प्रकरणावरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. 'खंबाटा प्रकरणात शिवसेनेनं सौदेबाजी केली असा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. ‘खंबाटाप्रकरणी मी अधिक चौकशी केली. त्यावेळी मला समजलं की, 2014 साली शिवसेनेच्या युनियन प्रमुखांनी तिथं सौदेबाजी केली. आजही 22 शाखा प्रमुखांना खांबटाकडून पगार मिळतो.’ असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

संबंधित बातम्या:

‘साहेब संपत्ती घोषित करणार का?’, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

फडणवीस महापौर असताना नागपूर महापालिकेत घोटाळा : शिवसेना

सेना मंत्र्यांना लाल दिव्याची सवय, सत्ता सोडणार नाहीत: पृथ्वीराज चव्हाण

रायगडमधील शिवसेना-काँग्रेस युतीवर ओवेसींचा निशाणा

शेतकऱ्याला कांदा जाळावा लागणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव: सुप्रिया सुळे