कोल्हापूर : शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज न्यू पॅलेसला भेट श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून महाराजांची भेट घेऊन दर्शन घेतल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांचा फोनवरून शाहू महाराजांशी फोनवरून संवाद झाल्याचे राऊत म्हणाले. 

Continues below advertisement

संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नसल्याचा आरोप केला होता. तसेच छत्रपती घराण्याचा अपमान केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी संभाजीराजे यांना खडे बोल सुनावताना उमेदवारी नाकारली म्हणून छत्रपती घराण्याचा अपमान कसा होऊ शकतो ? अशी विचारणा काल केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज न्यू पॅलेसला जात शाहू महाराजांची भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. 

प्रबोधनकार ठाकरेंपासून छत्रपती घराण्याशी नातं आहे, आमच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे राऊत यांनी सांगितले. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. फडणवीस यांनी महाराजांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला होता. या आरोपाचा समाचार घेत त्यांनी महाराजांना कोण चुकीची माहिती देईल ? असा सवाल केला. 

Continues below advertisement

काय म्हणाल होते शाहू महाराज ? 

राजेंना उमेदवारी नाकारण्यावरून सुरु असलेल्या चर्चेवरुन शाहू महाराज यांनी काल भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, आमच्यामध्ये काही विचार विनमय झाला असता किंवा मी सहमती दिली असती, नसती पण तसं काही झालं नाही. छत्रपती घराण्याचा निर्णय वैगेरे वेळोवेळी सांगत आले, पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तिगत होते. घराण्याचा नव्हे म्हणजे मला विचारलेलं नाही, किंवा माझी समंती घेऊन पावलं उचलली असं झालं नाही. 2009 सालापासून संभाजीराजे यांनी वाट वेगळी पकडली. भाजपनं दिलेल्या खासदारकीला माझा विरोध होता, पण शेवटी लोकशाही आहे. त्यावेळी देखील चर्चा झाली नाही. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मला सांगितलं होतं. 

उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध आला नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली असेही शाहू महाराज म्हणाले. यानंतर संभाजीराजे यांनीही ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही. म्हटले होते. 

हे ही वाचलं का ?