Sanjay Raut on Sunil Tatkare : सुनिल तटकरे (Sunil Tatkare)  हा फिरता रंगमंच आहे.  अजित पवारांना (Ajit Pawar) अडचणीत आणण्याचे काम या फिरत्या रंगमंचाने केल्याचा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.  चोरानं चोरासारखं वागावं, ज्यांनी गुन्हा केलाय, त्यांनी तोंड लपवतच फिरलं पाहिजे ही आमची भुमिका असल्याचे राऊत म्हणाले. गद्दाराने उगीच स्वाभिमानी आणि इमानीचा आव आणून फिरु नये, असे राऊत म्हणाले. 


एकनाथ शिंदे, फडणीस आणि अजित पवारांनी देशाची सुरक्षा धोक्यात आणली


राष्ट्रीय सुरक्षा कशाप्रकारे धोक्यात येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देशाला दाखवल्याचे राऊत म्हणाले. वेशांतर करुन गाठी भेटी घेण्याच्या मुद्यावरुन राऊतांनी त्यांच्यावर जोरदार टाकी केलीय. तुम्ही खोटी नावं, खोटी वेशांतरे करुन फिरत आहात. ही सर्व वेशांतर करणाऱ्या अल रशिदची पोरं असल्याचेही राऊत म्हणाले. वेशांतर करणाऱ्यांचे खोटे पॅन कार्ड बनवले गेले. खोटी आधार कार्ड बनवली गेली आहेत. त्यांना सुरक्षीत बाहेर पडता यावं म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सुचना असाव्यात असा आरोपही राऊतांनी केला. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काय करत होते? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. 


उदय सामंत यांच्यावरही राऊतांनी केली टीका


मंत्री उदय सामंत यांच्यावरही संजय राऊतांनी टीका केली. उदय सामंत यांनी राजकारणात अनेक वेळा बेईमानीचा जिहाद केला असल्याचे राऊत म्हणाले. त्याच्यावर आम्हाला एक कायदा आणावा लागेल असा टोला देखील राऊतांनी सामंतांना लगावला.


गेल्या काही काळापासून राज्यात महिलांवर अत्याचार वाढले


गेल्या काही काळापासून राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. यामध्ये सगळ्याच धर्माचे लोक आहेत. ही एक विकृती आहे. ही विकृती ज्याच्या मनामध्ये आहे, तो कोणत्याही धर्माचा असो त्याला फासावर लटकवलं पाहिजे असे मत संजय राऊतांनी व्यक्त केलं. यासंदर्भात जाणकार, सुशिक्षीत महिलांनी पुढे आलं पाहिजे असेही राऊत म्हणाले. नवी दिल्लीत आज संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. 


महत्वाच्या बातम्या:


महाराष्ट्रात फडणवीस असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य