Sanjay Raut : मिंधे गटानं आधी सावरकरांच्या साहित्याचं पारायण करावं आणि मग यात्रा काढावी असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं. भाजपला (BJP) सुद्धा सावरकरांच्या विचारांचं पारायण करण्याची गरज आहे. हे लोक सावरकरवादी असूच शकत नाहीत, असेही राऊत म्हणाले. सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार भाजपला (BJP) मान्य आहेत का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.
सावरकरांनी वैज्ञानिक दृष्टीकोण दिला
सावरकरांनी देशाला दिशा दिली आहे. एक वैज्ञानिक दृष्टीकोण दिला आहे. त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोण जर भाजप आणि त्यांच्याबरोबर असलेला मिंधे गट पाळणार असतील तर त्याचे स्वागत केले पाहिजे. सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवाद याचा संदर्भ दिला. भाजप गायीला गोमाता म्हणत आहे. पण सावरकरांना हे मान्य नव्हते. गाय हा उपयुक्त पशू आहे. जर गाय दूध द्यायची थांबली तर त्या गायीचं गोमांस खायला हरकत नाही हा सावरकरांचा विचार होता. हा विचार भाजपला मान्य आहे का? असेही राऊत म्हणाले. सावकरांनी शेंडी जाणव्याचं हिंदुत्व कधी स्वीकारलं नाही. सावरकरांना दाढी वाढवलेली आवडत नसे. मग आता शिंदे दाढी कापणार का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. आजपासून शिंदे गट शिवसेना आणि भाजप यांची सावरकर गौरव यात्रा सुरु होत आहे. या यात्रेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.
सभेची तयारी पूर्ण, आजची सभा ऐतिहासीक
छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या सभेची पूर्ण तयारी झाली आहे. आजची आमची सभा ऐतिहासीक होईल असेही राऊत म्हणाले. आजच्या या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचेराऊत म्हणाले. दरम्यान, धमकी आल्यानंतर तुमच्या सुरक्षेत काही वाढ करण्यात आली आहे का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी राऊतांना विचारला. त्यावेळी ते म्हणाले की, माझ्या सुरक्षेत कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मी सुरक्षा मागितलीही नाही. सरकारकडून सुरक्षेची अपेक्षा करणं म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखं असल्याचे संजय राऊत म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीच्यातीनही पक्षाची आज एकत्र सभा होत आहे. विशेष म्हणजे अशाच सभा राज्यभरात होणार असून, पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात पॉलिटिकल ड्रामा रंगताना पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: