बँड पथकाची कमाल, शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेही थिरकले!
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 15 Sep 2016 12:39 PM (IST)
औरंगाबाद: बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना कार्यकर्ते झिंगाट झाले आहेत. अशावेळी राजकारण्यांनाही ताल धरण्याचा मोह आवरला नाही. औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेही ताल धरताना पहायला मिळाले. 47 वर्षापासून औरंगाबादमध्ये असलेल्या या बँड पथकांनी श्रवणीय गाणी वाजवत उपस्थितांना ठेका धरायला लावला. गणेश आरतीपासून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर सध्या गाजत असलेलं झिंगाट गाणंही त्यांनी वाजवलं. एकीकडे प्रचंड मोठ्या आवाजात वाजविण्यात येणाऱ्या डॉल्बीला हे बँड पथक चांगले पर्याय ठरत असून औरंगाबादकरही या पथकांना पसंती देत आहेत. VIDEO: