नाशिक : मराठा समाजाचे मोर्चे आत्मसन्मासाठी असून इतर समाजानं या मोर्चामुळे असुरक्षित समजण्याचं कारण नाही, असं मत भय्यूजी महाराज यांनी व्यक्त केलं आहे. मराठा समाजाचे मोर्चे दलितविरोधी नाहीत, असंही ते म्हणाले.

महामोर्चे हे उच्चभ्रू मराठ्यांचे नसून गरीब, उपेक्षित मराठा समाजाचे आहेत. ज्या व्यक्ती समाजामुळे मोठ्या झाल्या त्यांनी समाजाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोर्चे काढण्याची वेळ आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

नुसते मोर्चे काढून काहीही होणार नाही तर सरकारशी चर्चा करुन मागण्यांची अभ्यासपूर्ण मांडणी करणंही आवश्यक असल्याचं भय्यूजी महाराज यांनी म्हटलं आहे.

इतर प्रमुख मुद्दे - * कधी नव्हे ते मराठे एकत्र आले आहेत, त्यांना व्यक्त होऊ द्या * मुख्यमंत्री फडणवीस यांचा काय दोष...? मराठ्यांच्या समस्या अनेक वर्षापासूनच्या आहेत * पटेल, गुर्जर आंदोलन पाहता मराठा मोर्चेकरी अभिनंदनास पात्र आहेत * हा देश कुणा एकाचा नाही, सर्व जाती धर्म, महापुरुषांचा आहे * माझ्यावर टीका करणाऱ्यांनी मला शिकवु नये. संभाजीचा पहिला ब्राँझ पुतळाही मी उभा केला आणि दलित, पारध्यांच्या मुलांच्या शाळाही सुरु केल्या आहेत

संबंधित बातम्या :

विनायक मेटे आणि मराठा मोर्चांचा संबंध नाही : मराठा संघटना

मराठा-दलित ऐक्यासाठी रिपाइंचे मोर्चे : आठवले

मुख्यमंत्र्यांचा मराठा मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्नः विखे पाटील