Uddhav Thackeray : या सरकारकडे देण्यासारखं काहीही नाही. फक्त जुमलेबाजी करत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) केली. हे सरकार जातीजातीमध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचे ठाकरे म्हणाले. सर्व समाजातील जनतेला मी विनंती करतो की आपापसात भांडण करु नका, तुमच्या सर्वांच्या न्याय्य मागणीबरोबर मी असल्याचे ठाकरे म्हणाले. दरम्यान उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणाच्या संदर्भात सर्वमान्य तोडगा काढा, मी आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मनोज जरांगे पाटलांना बोलवा, लक्ष्मण हाकेंना बोलवा. त्यांना सांगा खरच आरक्षण मिळते का? त्यांच्या जीवाशी का खेळता? असेही उद्धव ठाकरे म्हणाले.


मोदी गॅरंटीला लोकांनी उलथून लावलं


आमचं कुटुंब फोडलं, पवारांचं कुटुंब फोडलं आता जनतेचं कुटुंब फोडायला निघालात असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातले उद्योग गुजरातले नेले आहेत. मोदी गॅरंटीला लोकांनी उलथून लावल्याचेही ठाकरे म्हणाले. आम्ही केलेल्या कामाचे श्रेय हे सरकार घेत असल्याचेही ठाकरे म्हणाले. महालिसांठी योजना आणल्या आण्ही त्याचे स्वागत केले. पण युवकांसाठी काय? त्यांच्यासाठी रोजगार आहे का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.


आरक्षणाच्या संदर्भातील टक्केवारी वाढवण्यासाठी विधानसभेत ठराव करा


आरक्षणाच्या संदर्भातील टक्केवारी वाढवण्यासाठी विधानसभेत ठराव करा. शिवसेना तुम्हाला आज पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. संभाजीनगरसह कोकणातील पराभव माझ्या जिव्हारी लागल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.  


संभाजीनगरचा खासदार आमचा नाही याचे शल्य


संभाजीनगरचा खासदार आमचा नाही याचे शल्य आमच्या मनात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आपली हक्काची जागा गमवावी लागली याचे शल्य आहे. निष्ठेचा आदर करुन मी चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी दिली होती असे ठाकरे म्हणाले. याठिकाणची निवडणूक हरलो तरी पुन्हा आप जिंकू या इराद्याने मी इथे आलो असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. 


मी लाचारी आणि गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही


विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक असल्याचे ठाकरे म्हणाले. मी लाचारी आणि गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याला कलंक लागू देणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. या गळती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असल्याचे ठाकरे म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


उद्धव ठाकरे, शरद पवार काँग्रेसला धोका देणार, अनिल पाटलांचा दावा; आता पृथ्वीराज चव्हाणांकडून खरपूस समाचार; म्हणाले...