Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात भाष्य करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 


लाडकी बहीण योजना सारख्या योजना आमच्याच होत्या. अशा पाच योजनांची गॅरंटी आमचे नेते राहुल गांधी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलेल्या होत्या. सत्तेतले सरकार आमचीच नक्कल करायला निघाले. मात्र, नक्कल करायला पण अक्कल पाहिजे जी अक्कल या सरकारमध्ये नाही. निवडणुकीच्या तोंडावर घाईगडबडीने हा निर्णय घेतलेला आहे. महिला भगिनी पहिलेच महागाईच्या बोझ्याखाली आहे. गेल्या दहा वर्षापासून सरकारने मिळून जनतेला लुटले आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा आपल्याला मतं घेण्यासाठी हा केलेला त्यांच्या प्रयोग एक आहे.


नक्कल करायला पण अक्कल पाहिजे


जनतेला या सत्तापीपासू जे लोक आहेत, यांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या सर्व लोकांच्या लक्षात आहे. हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये असे प्रलोभन देणारी मानसिकता निवडणुकीच्या तोंडावर देऊन सत्ताधीश होण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र जनता त्यांना चांगलं ओळखून आहेत. त्यांचे उत्तर ऑक्टोबरच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता देणार आहे. म्हणून त्यांचा एक अयशस्वी प्रयत्न लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून होत आहे, हा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे, असा टोला नाना पटोले यांनी सरकारवर लगावलाय.


काँग्रेसची सत्ता आल्यास प्रथम जातीनिहाय जनगणना करू 


मनोज जरांगे पाटील यांना सरकारनं आश्वासन दिलं होते. मराठा, धनगर, गोवारी, हलबा या ज्या जाती आहेत त्यांना आश्वासन सत्तेत येण्यापूर्वी या भाजपने दिलं होतं. भाजप सत्तेत आहे आणि एक दोन वर्ष नाही तर दहा वर्षापासून केंद्राच्या आणि राज्याच्या सत्तेमध्ये हे लोक आहेत. त्यामुळे यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता यांनी करावी. ते कशी करावी हा त्यांच्या प्रश्न आहे. आमची भूमिका त्याच्यातली अशी आहे की, काँग्रेसची सत्ता आली की आम्ही आमचे नेते राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, आमच्या सरकार आलं तर आम्ही जातीनिहाय जनगणना करू. मात्र भाजपचं नरेंद्र मोदींचे सरकार म्हणतय की आम्ही जाती गणनाच करणार नाही. फक्त मतं घेण्यासाठी यांनी मराठा, धनगर, गोवारी, हलबा समाजाच्या वापर केला.


आज तोच समाज यांना प्रश्न विचारतोय त्याचे उत्तर त्यांच्याजवळ नाही. आम्ही सांगतो विश्वासाने की केंद्रात आमचं सरकार आलं असतं तर आता जातीनिहाय जनगणना सुरू झाली असती आणि मागाससह सर्व जाती करिता आरक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देता आले असते. त्याला न्यायाच्या प्रक्रियेमध्ये आणण्यात आलं असते.


भाजपने पेरलेलं हे विभाजनाचं आणि द्वेषाचं बीज आहे


सामाजिक न्यायाची भूमिका या देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होती ती सुरू झाली असती. पण भाजपला ते मान्य नाही. त्याच्यामुळे भाजपने पेरलेलं हे विभाजनाचं आणि द्वेषाचं बीज जे आहे. ते त्यांना भोगावे लागेल. असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय. मनोज जरांगे यांची शांती रॅली आणि हैदराबादच्या धरतीवर मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर शिंदे समिती हैदराबादला जात आहे. त्यावर नाना पटोले बोलत होते. 


इतर महत्वाच्या बातम्या