Omprakash Rajenimbalkar : धाराशिव लोकसभा मतदारसंघात (Dhrashiv loksabha Election) राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतायेत. काल धाराशिव लोकसभेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांचे पुत्र मल्हार पाटील (Malhar Patil) यांनी अजित पवार यांच्या सहमतीनेच आम्ही भाजपात गेल्याचे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि विद्यमान उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांनी थेट अजित पवारांनाच सवाल केला आहे. 2019 पासूनच राष्ट्रवादी फोडायचे षडयंत्र चालू होते का? याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी द्यावे असे ओमराजे म्हणाले. 


नेमकं काय म्हणाले होते मल्हार पाटील?


ठाकरे गटाचे उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान दिले आहे. 2019 पासूनच राष्ट्रवादी फोडायचे षडयंत्र चालू होते का? असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. याबाबत स्पष्टीकरण अजित पवार यांनी स्वतः द्यावे असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. 2019 ला अजित पवार यांच्या सहमतीनेच डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या परिवाराने राष्ट्रवादी सोडत भाजप प्रवेश केला होता. अजित पवार यांनी आम्हाला आधी पाठवले व त्यानंतर ते स्वतः भाजपसोबत आल्या गौप्यस्फोट उस्मानाबाद लोकसभेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी केला होता. तसेच आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप तर हातात धनुष्यबाण असल्याचे मल्हार पाटील म्हणाले होते. त्यानंतर ओमराजे निंबाळकरांनी त्यांच्यावर हल्लाबोल करत अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळं आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली असून, अजित पवार याला काय उत्तर देणार हे पाहावे लागेल. 


धाराशिव लोकसभा मतदारसंघातील लढत ही तगडी


धाराशिव लोकसभा मतदारसंघातील लढत ही तगडी समजली जात आहे. ठाकर गटाने पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्याव विश्वास टाकत त्यांनी उमेदवारी दिलीय. तर महायुतीकडून ही जागा अजित पवार गटाला देण्यात आली आहे. त्यामुळं येथून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या निवडणूक लढवत आहेत. दोन्ही नेत्यांच्या प्रचाराला वेग आला आहे. त्यामुळं ठिकठिकाणचं राजकीय वातावरण गरम होत असल्याचं चित्र या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


अजित पवार यांनीच आम्हाला भाजपमध्ये पाठवलं, रक्तात राष्ट्रवादी, ह्रदयात भाजप आणि हातात धनुष्यबाण, मल्हार पाटलांचा गौप्यस्फोट