Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जगातलं दहावं आश्चर्य असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं. विधानपरिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवातून देवेंद्र फडणवीसांना वैफल्य आले आहे. आमच्या प्रतिमांना तडे देण्यासाठी ते खोटी वक्तव्य करत आहेत. ते आणखी पहाटेच्या शपथविधीतून बाहेर पडले नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले.


Shivsena : शिवसेनेचा विश्वासघात केला


शरद पवारांशी बोलून जर पहाटेचा शपथविधी झाला असता तर नक्कीच सरकार चालले असते. सरकार 72 तासात कोसळले नसते असेही संजय राऊत म्हणाले. अलिकडे देवेंद्र फडणवीसांची वक्तव्य मी पाहत आहे. देवेंद्र फडणवीस हे जगातलं 10 आश्चर्य आहे. दिल्लीत दोन आश्चर्य बसली असल्याचे राऊत म्हणाले. मुख्यमंत्रीपदाबात तुम्ही शिवसेना विश्वासघात केला आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचे ठरले होते. अमित शाह यांच्यासमोर फडणवीस काय बोलले होते. सत्तेच वाटप फिप्टी फिप्टीचे त्यांनी मान्य केले होते असेही राऊत म्हणाले. 


Sanjay Raut on Ajit Pawar : अजित पवार भाजपला आव्हान देत आहेत


सहा महिन्यापूर्वी 40 आमदारांचा महाराष्ट्रात जो शपथविधी झाला तोही शरद पवार यांच्या सांगण्यावरुन झाला असेही देवेंद्र फडणवीस सांगू शकतात असे राऊत म्हणाले. ते एका वैफल्यातून ते बोलत आहे. त्यांच्या सरकारविषयी राज्यात तिरस्कार आहे. विधानपरिषद निवडणुकामध्ये त्यांचा दारुन पराभव झाला आहे. उद्याच्या पोटनिवडणुकीत त्यांना पराभव दिसत असल्याचे संजय राऊत म्हणाले. अजित पवार ठामपणे महाविकास आघाडीच नेते म्हणून महाराष्ट्रात वातावरण तयार करत आहेत. भाजपला आव्हान देत आहेत. त्यामुळं फडणवीसांनी कितीही खोटी वक्तव्य केली तरी लोकांचा विश्वास बसणार नसल्याचे राऊत म्हणाले.


महाराष्ट्रातील वातावरण फडणवीस आणि मिंदे सरकारच्या विरोधात 


पहाटेच्या शपथविधीच्या दचक्यानं फडणवीसांना आणखी जाग येते. याची कारण त्यांनी शोधली पाहिजेत आणि उपचार केले पाहिजेत. महाराष्ट्रातील वातावरण फडणवीस आणि मिंदे सरकारच्या विरोधात आहे. त्यामुळ संजय राऊत तसे बोलत असल्याचं राऊत म्हणाले. कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत देकील भाजपचा पराभव होईल असे संजय राऊत म्हणाले. सत्ता स्थापनेच्यावेळी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांचे फोन टॅप केल्याचे राऊत म्हणाले. विधनपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्यातून देवेंद्र फडणवीसांना वैफल्य आले आहे. आमच्या प्रतिमांना तडे देण्यासाठी ते खोटी वक्तव्य करत असल्याचा निशाणा राऊत यांनी फडणवीसांना लगावला.  


महत्त्वाच्या बातम्या:


Sanjay Raut : भगतसिंह कोश्यारींनी भाजपचे एजंट म्हणून काम केलं, नवीन राज्यपाल बैस की बायस...वाचा नेमकं काय म्हणाले राऊत