शिवतीर्थ (मुंबई) : शिवसेना दसरा मेळाव्यात (Shiv Sena Dasara Melava 2023 Live Updates) पहिली बॅटिंग माझी मुंबईची महापौर म्हणून झाली आहे, कोणीही आरोप करू दे आम्ही धुरा वाहत आहोत. त्यांना येत्या निवडणुकीत क्षमा करायची नाहीच, निवडणूक येऊ दे काय करायचं आपण पाहू, बुथवाईज विचार पोहोचवा, असे आवाहन मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केले.  


बाळासाहेबांचा आत्म कुठे आहे? विचारांचा कचरा केला आहे


शिंदे गटाला पहिल्यांदा अजित पवारांची अडचण होती म्हणून सांगत होते, आता काँग्रेसचं नाव घेत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. आमच्या शिवसैनिकांना पैसे देऊन आणयला लागतं नाही. कोणी तरी म्हणाले, बाळासाहेबांची खुर्ची तिथं आहे अश्या खूर्च्या खूप आहेत, पण बाळासाहेबांचा आत्म कुठे आहे? विचारांचा कचरा केला आहे अशा शब्दात त्यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. 


शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात (Uddhav Thackeray Dasara Melava 2023 Live) पहिलं भाषण किशोरी पेडणेकर यांनी केलं. पेडणकरांनी यांनी आपल्या छोटेखानी भाषणात शिंदे गट आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे, तर देशातील सर्वच जनता त्रस्त आहे. कधी नाही तो उकाडा वाढला गेला आहे. राजकीय वातावरण तापवलं गेलं आहे, या तापलेल्या वातावरणात शिवसैनिक याठिकाणी जमले आहेत. 


आम्ही मुंबईच्या विकासासाठी ठेवी ठेवल्या, त्यावर घाला घातला जात आहे


त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही मुंबईच्या विकासासाठी ठेवी ठेवल्या, त्यावर घाला घातला जात आहे. एकवेळ मनसे अध्यक्षांनी सुद्धा सांगितलं की, मुंबईचा डान्सबार करू नका. मुंबईच्या ठेवी बुडवून प्रकाश करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण बुडाखाली अंधार आहे. 


आम्ही केलेल्या कामांमुळे तसेच आदित्य ठाकरे यांनी केलेल्या कामामुळे मुंबईत पाणी भरलं नाही, हा आपला विजय आहे.  मुंबईच्या तळहाताप्रमाणे फोडाप्रमाणे जपत आहोत. मुंबईकर हुशार आहेत, राज्यातील जनता हुशार आहे. खूर्च्या खूप मिळतात, पण बाळासाहेबांचा आत्मा आणून दाखवा, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.


इतर महत्वाच्या बातम्या