अहमदनगर  : आम्हाला 40 आणि तुम्हाला 50 दिवस दिले, पण आता तुमच्या पायाला हात लावून सांगतो की आपल्या बाळाला न्याय द्यायचा असेल तर समान्य धनगरांनी पेटून उठलं पाहिजे, असं धनगर समाजाच्या मेळाव्यात मनोज जरांगे यांनी म्हटलं. तसेच जर मी आता सोडणार नाही, तुमच्या छाताडावर बसून आरक्षण घेईन असा निर्धार देखील जरांगे पाटलांनी या दसरा मेळाव्यात केला.मी शब्द देतो आम्ही ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास देखील यावेळी मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. हमदनगरमधील चौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या धनगर समाजाच्या दसरा मेळावाल्या मनोज जरांगे यांनी उपस्थिती लावली. तर यावेळी त्यांनी धनगर समाजाच्या पाठिशी मराठा समाज उभा असल्याचं देखील म्हटलं. 


आम्ही तुमच्या पाठिशी - मनोज जरांगे 


'तुम्हाला सावध व्हावं लागेल, मराठा बांधव धनगर समाजाच्या मागे उभा राहील. मला माझ्या जातीशी दगाफटका करता आला असता पण मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे. आता सरकारला दिलेली मुदत संपत आलीये. चे फोन येत आहेत अभ्यासाला वेळ पाहिजे पण आम्ही नकार दिला. अभ्यास खूप झाला,काय वाचतेत कुणास ठाऊक. त्यामुळे आता काहीही होऊ दे आता आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही', असं मनोज जरांगे यांनी या दसऱ्या मेळाव्यात म्हटलं. 


सरकारला आरक्षण द्यावच लागेल - जरांगे 


सरकारला आरक्षण द्यावंच लागेल. पण त्यासाठी तुम्ही एकत्र यावं लागेल. तुम्ही घरा घरातून एकत्र या मग आपण एकत्र येऊन पाहू आरक्षण कसं मिळत नाही. आपलं धुखण एकच पडलेलं सरकार म्हणत की आमचं सरकार आलं की आरक्षण देऊ, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. 


'तर सरकारचं डोकं ठिकाणावर येईल..'


मी तुम्हाला मुलगा म्हणून सांगतो, विनंती करतो तुम्ही उद्यापासून एकत्र आलात तर सरकारचं डोकं ठिकाणावर येईल. 50 दिवस वाट पाहू नका. आम्हाला पण पण 40 दिवस दिले आणि शेवटाला आले. तुम्ही जर आम्हाला आरक्षण देत नाही, तर आम्ही पण तुमच्या दारात येणार नाही, असं निर्धार जरांगे यांनी केला. 


आपल्यासाठी नाही तर आपल्या लेकरांसाठी आपल्याला लढा उभारायचा आहे. त्यासाठी आरक्षण हवंय. म्हणून आता आम्ही शांततेत लढा उभारण्याचं निश्चित केलंय. तर आज दसऱ्याची शपथ घेऊ, की आरक्षण शिवाय आता दुसरा विषय बोलायचाच नाही. 


मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या 40 दिवसांची मुदत आज संपली आहे. तर उद्यापासून मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाची हाक पुकारली आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान धनगर समाज देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतयं. त्यावर मनोज जरांगे यांनी दोन्ही सरकारच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारवर हल्लाबोल केला. 


हेही वाचा : 


Sharad pawar On Yuva Sangharsha Yatra : युवा संघर्ष यात्रा ही नव्या पिढीची दिंडी; युवा संघर्ष यात्रेसाठी शरद पवारांकडून रोहित पवारांना भरभरुन शुभेच्छा