जालना : काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याविरोधात शिवसेनेनं जालन्यात तक्रार केली आहे. संजय निरुपम यांनी भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर संशय व्यक्त केला होता.

संजय निरुपम यांनी असं वक्तव्य करुन भारतीय नागरिक आणि लष्कराचा अपमान केला असून, हे वक्तव्य चिथावणीखोर असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. जालन्यातील कदीप पोलिस ठाण्यात हा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. निरुपमविरोधात गुन्हा नोंदवला नाही तर आंदोलन करु असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

मोदीजी, मला असुरक्षित वाटतंय, निरुपम यांच्या पत्नीचं पत्र

दरम्यान, संजय निरुपम यांनी सर्जिकल स्ट्राईकबाबत संशय व्यक्त केल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. निरुपम यांच्यावरच नाही तर त्यांच्या कुटुंबालाही लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळेच निरुपम यांच्या पत्नीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

आपल्याला अत्यंत गलिच्छ शब्दात धमक्या येत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. आपल्या पतीने केलेलं भाष्य राजकीय स्वरुपाचं होतं, त्यावर वेगळ्या पद्धतीने उत्तर देता आलं असतं, मात्र टीकाकारांनी नीच पातळी गाठल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातमी

मोदीजी, मला असुरक्षित वाटतंय, निरुपम यांच्या पत्नीचं पत्र