मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज बैठक बोलावली आहे. काही दिवसांवर पावसाळी अधिवेशन येऊन ठेपलं आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेना भवानात दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत अधिवेशनातील रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसात राज्य आणि केंद्रात अत्यंत महत्त्वाचे निर्णय झाले. त्यामध्ये कर्जमाफी, जीएसटी, जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय असा निर्णयांचा समावेश आहे. या सर्वच मुद्द्यांवर पावसाळी अधिवेशन गाजणार आहे. त्यामुळे या मुद्द्यांवर शिवसेनेची काय भूमिका असेल, यासंदर्भात उद्धव ठाकरे आज आमदारांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.