Shivrajyabhishek Din 2022 : प्रभो शिवाजी राजा! आज शिवराज्याभिषेक दिन... सोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

Shivrajyabhishek Din 2022 : आज शिवराज्याभिषेक दिन आहे. रायगडावर आजचा सोहळा थाटामाटात साजरा होत आहे. शिवभक्तांची लगबग पाहायला मिळत आहे. यासंदर्भात प्रत्येक अपडेट्स पाहा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jun 2022 12:43 PM

पार्श्वभूमी

Shivrajyabhishek Din 2022 : आज शिवराज्याभिषेक दिन. या निमित्तानं आज दुर्गराज रायगड दुमदुमणार आहे. यंदा शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) दिन मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला शिवभक्तांना हजेरी लावता...More

शिवरायांवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करणार

आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातं आहे. किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात शिवराज्यभिषेक दिन साजरा केला जात आहे. शिवराज्यभिषेक दिन आता शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. दरम्यान शिवराज्यभिषेक दिननिमित्त संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवरायांवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात येणार आहे.