सातारा : 'जय शिवाजी, जय भवानी'च्या  घोषणा आणि पोवाडा, ढोल-ताशा-हालगी, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजरात आज प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.


'जय शिवाजी, जय भवानी'च्या गजराने अख्खा प्रतापगतड नाहून निघाला. शिवप्रताप दिन म्हणजे प्रतापगडावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवलेल्या शौऱ्याचा दिवस.

शासनाच्या पुढाकराने हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. उपजिल्हाधिकारी अश्विन मुद्गल पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांच्या हस्ते आई भवानी मातेचे पूजन केले.

ध्वजारोहणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असलेली पालखी वाजत गाजत गडाकडे स्वार झाली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या पालखी पुढे लेझीमच्या तालावर शाळकरी मुलांचा चांगलाच डाव रंगला होता.

'जय भवानी, जय शिवाजी'च्या गजरात निघालेल्या मिरवणुकीतील एक विशेष म्हणजे महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा महिला सोनाली शिंदे यांनी खांद्यावर पालखी घेतली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ हेलिकॉप्टरने अवकाशातून पुष्पवृष्टी करण्यात आली.