मुंबई नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) तलवारधारी पुतळ्याचं लोकार्पण केलं. प्रत्येक शिवप्रेमींचा ऊर अभिमानानं भरून आला. मात्र आज त्याच शिवरायांसमोर मान शर्मेनं खाली घालण्याची वेळ ओढवलीय  आणि महाराज आम्हाला माफ करा असं म्हणण्याची वेळ आली आहे.  कारण अवघ्या  8 महिन्यांत राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला आहे.  एकीकडे महाराष्ट्राच्या आराध्य देवताचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत.  याप्रकरणी एक पत्र समोर आले असून या पत्राची सध्या चर्चा सुरू आहे. 


 तर दुसरीकडे पुतळ्यावरून आरोप- प्रत्यारोपाची राजकीय लढाई सुरू झाली आहे. शिवराज्य ब्रिगेड सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुनील पारकर यांनी एक - सव्वा महिना महिना अगोदर काल जी घटना त्या घटनेच्या अनुषंगाने  सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांना पत्र देऊन छत्रपती यांच्या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे व सदर कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावरती कारवाईकरांची मागणी केली होती. परंतु त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली पाहायला मिळाली नाही. अखेर ते स्मारक काल कोसळल्याची बातमी आपण सर्वांनी पाहिली. अशा मस्तवाल अधिकाऱ्यावर जर सरकार कारवाई करणार नसेल तर शिवराज्य ब्रिगेड कारवाई  असा इशारा दिला आहे. 


 दोन जणांविरोधात गुन्हा दाखल


राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी  दोन लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.  शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉ. चेतन पाटील यांच्याविरोधात चुकीचा आणि निकृष्ट दर्जाचा पुतळा उभारल्याचा गुन्हा दाखल झाला आहेय  शिल्पकार जयदीप आपटे मूळ कल्याणचे राहणारे तर  स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉ. चेतन पाटील कोल्हापूरचे राहणारे आहेत. सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उप विभाग, मालवण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संबंधित जबाबदार दोघा विरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 109, 110, 125, 318, 3 (5) सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा रजि.नं. 133/2024 अन्वये दाखल करण्यात आलेला आहे.


शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर राजकोट किल्ल्यावर पाहणी करणार आहेत. तर आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील आज मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पाहणी करणार आहेत.  नौदलाचे अधिकारी देखील राजकोट किल्ल्यावर येऊन घटनेची पाहणी करून माहिती घेणार आहेत.


हे ही वाचा :


 नेव्हीला बदनाम करू नका, चूक झाली असेल तर माफी मागा; शिवरायांच्या पुतळ्यावरुन सतेज पाटील संतापले