Sanjay Gaikwad : भाजप देवाभाऊमय आहे, तर महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊ ठरवतात असं वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड ( Sanjay Gaikwad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंगलप्रभात लोढा यांचे हे वैयक्तिक मत असू शकतं. आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सल्ल्याने चालतो. आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे असल्याचे गायकवाड म्हणाले. आम्ही जी क्रांती केली त्यामुळं भाजप आणि महायुती सरकारमध्ये असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं
दरम्यान, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यकीय नेते ऐकमेकांवर टीका टिपण्णी आरोप प्रत्यारोप करत आहेत. तर काह ठिकाणी महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र देखील नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं. अशातच भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाजप देवाभाऊमय आहे, तर महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊ ठरवतात असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं. मंगलप्रभात लोढा यांचे हे वैयक्तिक मत असू शकतं. आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्याने चालतो असं गायकवाड म्हणाले. आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे असल्याचे गायकवाड म्हणाले. आम्ही जी क्रांती केली त्यामुळं भाजप आणि महायुती सरकारमध्ये असल्याचे गायकवाड म्हणाले. मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर संजय गायकवाड यांनी जोरदार टोला लगावला आहे. त्यामुळं आता संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा काय प्रतिक्रिया देणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून महायुतीत देखील सर्व काही ठिक नसल्याचे बोलले जात आहे. कारण नगरपंचायत आणि नगरपिषदांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर टीका देखील केल्याचं पाहायला मिळालं होतं.
महत्वाच्या बातम्या:
Sanjay Gaikwad : निवडणुकीत इतकं तितकं होत असतं, हा काय बिहार थोडी आहे; मुलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय गायकवाडांची प्रतिक्रिया, पोलिसांवर फोडलं प्रकरणाचं खापर