Mumbai News Update : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 5 जूला आयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. परंतु, आता राज ठाकरे यांच्या आधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे या आयोध्या दौऱ्यावरुन मनसे आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता या दौऱ्यावरून शिवसेनेने पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टरबाजीतून शिनसेनेने 'असली आ रहा है, नकली से सावधन' असे लिहून राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.   


आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी  शिवसेनेकडून जोरदार तयारी केली जात आहे. परंतु, या दौऱ्याआधी शिवसेनेने पोस्टरबाजीतून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 'असली आ रहा है, नकली से सावधन' असा आशय असणारे अनेक पोस्टर आयोध्येत लावण्यात आले आहेत.  आदित्य ठाकरे यांनी आपल्या आयोध्या दौऱ्याची तारीख अजून जाहीर केली नसली तरी ते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.


मनसेकडूनही पोस्टरबाजी
राज ठाकरे यांनी आपला आयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर मनसेकडूनही अयोध्येत पोस्टर लावण्यात आले होते. 'राज' तिलक की करो तैयारी आ रहे है भगवा धारी, चलो अयोध्या...' असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आलं होतं. राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. मनसेकडून राज ठाकरे यांच्या या दौऱ्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे.


दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार आदित्य ठाकरे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.  



महत्वाच्या बातम्या


BMC : मुंबईकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार, समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ


Raj Thackeray : खबरदार! माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलाल तर..., राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सज्जड दम