Shiv Sena MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेच्या प्रत्यक्ष सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification) आजपासून सुरू होणार आहे. शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाच्या (Shinde Group) 40 आमदारांची आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. 14 सप्टेंबरला सुनावणीची ही प्रक्रीया पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.
शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमोर आज म्हणजेच, 14 सप्टेंबरपासून सर्व शिवसेना आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. या सुनावणीला बुधवारी दुपारी बारा वाजता सुरुवात होईल. राज्य विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी होणार आहे. एकाच दिवशी सर्व 54 आमदारांची सुनावणी होईल. या सुनावणीसाठी शिवसेनेतल्या शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना हजर राहावं लागणार आहे. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांसमोर तब्बल 34 याचिकांवर सुनावणी होईल. या सुनावणीत वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करून आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येईल. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी होणार असून, संबंधित आमदारांना त्या-त्यावेळी बोलावण्यात येणार आहे.
ठाकरेंची रणनिती काय?
विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदारांच्या पात्र-अपात्रते संदर्भातील सुनावणी आजपासून सुरू होत आहे. या सुनावणीला कसं सामोरं जायचं? याचं नियोजन ठाकरे गटानं केलं आहे. ठाकरे गटाकडून त्यांचे दोन वकीलच आमदारांची बाजू अध्यक्षांसमोर मांडतील. अध्यक्षांकडून वैयक्तिकरित्या आमदारांना आपलं म्हणणं मांडा, असं सांगितलं तरच आमदार स्वतः आपली भूमिका मांडतील. आज सकाळी 11 वाजता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ठाकरे गटाच्या आमदारांची एक बैठक होईल आणि त्यानंतर बारा वाजता ठाकरे गटाचे सर्व आमदार आणि वकील सुनावणीसाठी उपस्थित राहतील, अशी माहिती मिळत आहे.
शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरणार, सर्वोच्च न्यायालयानं निकाल लिहून दिलाय; अनिल परबांचा दावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरणार असा निकाल सुप्रीम कोर्टानं लिहून दिलाय. फक्त निकाल यायचा बाकी असल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केलाय. तसंच सरकार पडणार होतं हे भाजपला आधीच माहित असल्यानं त्यांनी राष्ट्रवादी फोडली असल्याची प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :