मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification Result Case) आज निकाल येणर आहे.  दुपारी चारनंतर हा निर्णय येणार आहे.  कुठल्या गटाचे आमदार अपात्र ठरणार, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष आहे.अपात्रतेबाबत काय निर्णय होणार? असा प्रश्न सर्वांना आहे मात्र आज निर्णय होणार का? असा प्रश्न मला पडतोय कारण अजूनही प्रकरणातील  वकील म्हणून मला किंवा इतर  वकिलांना Maharashtra Legislative Assembly सचिव यांच्याकडून इमेल आलेली नाही की राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)  किती वाजता निर्णय जाहीर करणार? अशा आशयाची फेसबुक पोस्ट ठाकरे गटाचे  वकिल असीम सरोदे (Asim Sarode)  यांनी केली आहे. आज किती वाजता निर्णय जाहीर करणार?, हे कळवायला उशीर का? असा सवाल सरोदे यांनी केला आहे.


असिम सरोदे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल की, अपात्रतेबाबत काय निर्णय होणार? असा प्रश्न सर्वांना आहे मात्र आज निर्णय होणार का? असा प्रश्न मला पडतोय कारण अजूनही प्रकरणातील  वकील म्हणून मला किंवा इतर  वकिलांना Maharashtra Legislative Assembly सचिव यांच्याकडून इमेल आलेली नाही की राहुल नार्वेकर किती वाजता निर्णय जाहीर करणार?


वेळ अद्याप कळवलेली नाही : असिम सरोदे


असिम सरोदे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, मला आतापर्यंत कोणाचा ईमेल आलेला नाही.  Maharashtra Legislative Assembly सचिव त्यांचा इमेल येत असतो. किती वाजता हजर राहायचे या संदर्भात कोणता इमेल आलेला नाही किंवा वेळ देखील कळवलेली नाही.  अद्याप वेळ कळवलेली नाही. वेळ ठरलेली नाही. दुपारी एक ते दीड दरम्यान आम्ही पोहचणार आहे. 



निकालाच्या दोनच शक्यता


निकालाच्या शक्यतांवर बोलताना असीम सरोदे म्हणाले, अपात्रतेच्या बाबतीत निकालाच्या दोनच शक्यता आहेत. एक कायदेशीर आणि दुसरी बेकायदेशीर.तरीही प्राधान्यक्रमाने पहिली शक्यता आहे की बेकायदेशीर निर्णय येईल व एकनाथ शिंदेंसह सगळ्या आमदारांना पात्र ठरवले जाईल.दुसरी शक्यता कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे ती म्हणजे शिंदेंसह सगळे अपात्र ठरतील.


महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे डोळे आजच्या निकालाकडे


महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे डोळे आजच्या निकालाकडे लागले आहेत. प्रचंड धक्कादायकरित्या घडलेल्या या सत्तानाट्याने महाराष्ट्राचा राजकीय पटच बदलून टाकला.  उद्धव ठाकरेंना चेकमेट करून शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र आता कोर्ट शिंदेंसोबत गेलेल्या १६ आमदारांना पात्र ठरवणार की अपात्र?, शिंदेंनी मांडलेला सत्तेचा डाव विस्कटणार की अभय मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणारेत. तीन पक्षांची मोट बांधून निर्माण झालेल्या महाविकास आघाडीसह, शिंदेंना सोबत घेऊन सत्तेत सहभागी झालेल्या भाजपचेही डोळे आजच्या निकालाकडे लागले आहेत.