MLA Disqualification Case :  राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय भवितव्यासाठी गुरुवारचा दिवस महत्वाचा ठरला आहे. 10 जानेवारी 2024 म्हणजेच गुरुवारी शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case) सुनावणीचा निर्णय जाहीर झालाआहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर केलाय. राहुल नार्वेकर यांनी महेश शिंदे यांना पात्र ठरवले आहे. 


उद्धव ठाकरेंच्या बाजूच्या 14 आणि एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेवर पडदा उठणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काही मोठे उलटफेरदेखील झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात धक्कादायक निकालाची नोंद करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यावर आमदार अपात्रतेची टांगती तलवार आहे. 


2019 च्या निवडणुकीत काय झालं?


2019 विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदे यांनी पहिल्यांदाच विजय मिळवला. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज उमेदवार शशिकांत शिंदे यांना पराभवाची धूळ चारली. महेश शिंदे यांना 1,01,487 मते मिळाली. तर, राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांना 95,255 मते मिळाली. दोन टर्मचे आमदार असलेले शशिकांत शिंदे यांना 6,232 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. 


भाजपमधून शिवसेनेत आलेल्या शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघावर शिवसेनेचा झेंडा फडकावला. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडात सहभागी झाले आणि सूरत मार्गे गुवाहाटीत दाखल झाले. ठाकरे गटाने त्यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. 



शिवसेनेत फूट का पडली?


2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत काडीमोड घेत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्यात महाविकासआघाडीचा नवा प्रयोग झाला. पण जवळपास दोन वर्षानंतर राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार कोसळलं. त्याला एकनाथ शिंदेंचा बंड हे कारण ठरले. एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना हाताशी धरत शिवसेनेतून वेगळी वाट धरली. ते सूरतमार्गे गुवाहाटीमध्ये पोहचले. एकाचवेळी 40 आमदारांनी साथ सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेयांच्यासह 16 आमदारांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करत याचिका दाखल केली. त्यानंतर जे काही घडलेय ते सगळ्या देशानं पाहिलं. याच प्रकरणाचा निकाल लागणार आहे.