MLA Disqualification Case : मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला (Maharashtra Politics) पुन्हा कलाटणी देण्याची क्षमता असलेला शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case) सुनावणीचा निर्णय आज लागला. साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या सुनावणीचा निर्णय येणार असल्यानं सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच (CM Eknath Shinde) अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. पण ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार अपात्र ठरले तर तो उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा दणका असेल. कारण ठाकरे गटाकडे आधीच केवळ 16 आमदार शिल्लक आहेत, त्यातील 14 अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो. असे म्हटले जात होते. आज आमदार अपात्रता प्रकरणात अजय चौधरी पात्र ठरले आहेत.


महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या (MLC election) निकालानंतर शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडली. बंडामागे शिवसेनेतील प्रबळ नेतृत्त्व असलेल्या एकनाथ शिंदेंचं नाव असल्याचं समोर आलं. त्यात शिंदेंचा फोन नॉट रिचेबल. प्रसार माध्यमांवर महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या बातम्या झळकू लागल्या आणि हादरे थेट दिल्लीला बसले. अशातच ठाकरे थेट अॅक्शन मोडमध्ये आले. ठाकरेंनी विधीमंडळ गटनेते पदावरुन एकनाथ शिंदेंची हकालपट्टी केली आणि त्या पदावर त्यांच्यासोबत असलेल्या आमदार अजय चौधरींची नियुक्ती केली. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेत मागच्या फळीत काम करणारे शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय चौधरी अचानक प्रकाश झोतात आले. जाणून घेऊयात त्यांच्यासोबत सर्वकाही... 


कट्टर शिवसैनिक, दोन टर्म आमदार असलेले अजय चौधरी कोण? 


अजय चौधरी हे शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. 2019 मध्ये विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी 40 हजार मताधिक्क्यानं विजयी झाले होते. त्यांनी मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दारुण पराभव केला होता. चौधरी हे परळ येथे वास्तव्यास आहेत. शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून अजय चौधरींची संपूर्ण मतदारसंघात ओळख. 2014 साली शिवसेनेतून विधानसभेवर निवडून गेले. 2015 मध्ये शिवसेनेनं त्यांच्याकडे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पद दिलं. 2019 साली शिवसेनेनं त्यांना पुन्हा एकदा तिकीट दिलं. पक्षानं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत अजय चौधरी 2019 साली विधानसभेवर पुन्हा निवडून आले.


शिंदेंची हकालपट्टी, गटनेतेपदाची माळ चौधरींच्या गळ्यात 


शिवसेनेच्या गटनेतपदावरून शिंदे यांना डच्चू देण्यात आला आहे. त्याऐवजी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, शिवसेनेने याबाबतची अधिकृत घोषणा केली नाही. या आधी गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांची आमदार म्हणून दुसरी टर्म आहे. त्यामुळे त्यांच्याकडे गटनेतेपदाची ही धुरा देण्यात आली आहे.


2019 मध्ये दुसऱ्यांदा शिवडीत भगवा फडकावला 


शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी यांनी मोठा विजय मिळवलेला. अजय चौधरी यांनी तब्बल 42 हजार मतांनी विजय मिळवत पुन्हा एकदा शिवडी मतदारसंघावर भगवा फडकवलेला. चौधरी यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार उदय फणसेकर आणि मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दणदणीत पराभव केला. चौधरींच्या तुलनते या दोन्ही उमेदवारांचा मतदारसंघात तितका जनसंपर्क नव्हता. अजय चौधरी यांचा विधानसभा निवडणूक 2014 मध्येही विजय मिळवलेला. 


2009ची परिस्थिती वगळता 80च्या दशकापासून शिवडी मतदारसंघावर शिवसेनेचंच वर्चस्व आहे. मराठमोळ्या मतदारांच्या पाठिंब्यामुळे शिवडी मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. विधानसभेच्या 2009च्या निवडणुकीत शिवडी मतदारसंघातून दगडू सकपाळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली. पण मनसेच्या बाळा नांदगावकरांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2009 मध्ये मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेल्या बाळा नांदगावकरांचा करिष्मा 2014 मध्ये मात्र फारसा दिसला नव्हता. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत अजय चौधरी यांनी विजय मिळवत नांदगावकरांना पराभवाची धूळ चारली. 2019 च्या निवडणुकीत बाळा नांदगावकर यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानं चौधरी यांच्यासमोर विरोधकांकडून तगडा उमेदवार रिंगणात नव्हता. त्यामुळे चौधरींनी 2019 मध्येही शिवडी विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भगवा फडकावला. 


दरम्यान, सध्या अजय चौधरी पुन्हा चर्चेत आले आहेत, मात्र आमदार अपात्रतेच्या निकालामुळे. आता आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आजच जाहीर होणार आहे. अशातच अजय चौधरी अपात्र ठरले तर काय? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


MLA Disqualification Case: शिवसेनेचे मुख्यनेते, बंडाचे कर्तेधर्ते; 40 आमदारांसह गुवाहाटी गाठणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पात्र की अपात्र?