पुणे: वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत येणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले. यावेळी त्यांनी चक्क विरोधी पक्षाच्या नेत्यांची जीभ कापणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देणार असं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता नेत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत, गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) बोलताना चुकलेत असं म्हटलं आहे. 


संजय गायकवाडांच्या (Sanjay Gaikwad) कालच्या बेताल वक्तव्यामुळे सगळेच राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच संजय गायकवाड बोलताना चुकले आहेत, हे मला वैयक्तिक वाटतं आहे. पक्ष त्यावर काय बोलेल माहिती नाही, आमचे नेते एकनाथ शिंदे यांना आमच्या पक्षाचे सर्व अधिकार आहेत. ते जे बोलतील तेच अंतिम राहील त्यामुळे मला तरी वाटतंय याबाबतीत मुख्यमंत्री उचित निर्णय घेतील आणि त्याची माहिती आपल्याला सुद्धा देतील, असं वक्तव्य अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलं आहे. 


काय वादग्रस्त वक्तव्य केलंय संजय गायकवाडांनी?


 संजय गायकवाडांनी (Sanjay Gaikwad), जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देणार असल्याचं वादग्रसेत वक्तव्य केलं आहे. 


राहुल गांधीवर केलेल्या वक्तव्यावर मी ठाम- संजय गायकवाड


मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी या काँग्रेसच्या मागणीवर बोलताना संजय गायकवाड म्हणाले,  राहुल गांधीविषयी केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे. मी केलेले वक्तव्य हे माझं वैयक्तिक वक्तव्य आहे.  मी वक्तव्य केले मी माफी मागत नाही तर माझे  मुख्यमंत्री का माफी मागतील, असंही गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी म्हटलं आहे. 


मी गुन्ह्याची परवा करत नाही - संजय गायकवाड


संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्यावर भारतीय न्याय संहिता नुसार 192, 351 (२) , ३५२ (३), ३५२ ( ४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, विजय वडेट्टीवार यांचा आम्ही आदर करतो, त्यांनी त्यांच्या नेत्याला शिकवावं. आम्हा गोरगगरीबांचे आरक्षण हिसकवण्याची भाषा करतात. पहिले आपल्या नेत्याला शिकवा आणि मग आमचा निषेध करा. मी गुन्ह्याची परवा करत नाही. जर 70 कोटी जनतेचे आरक्षण वाचविण्यासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तर मी ते स्वीकारायला तयार आहे, असेही संजय गायकवाड म्हणाले आहेत.