Sanjay Raut : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज ठाण्यातील उत्तरसभेत केलेल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राज ठाकरे यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी अगदी मोजक्या शब्दात उत्तर दिले आहे. "दिवा विझताना मोठा होतो, हे आज पुन्हा दिसले. जय महाराष्ट्र." असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. याचा उल्लेख करत आज राज ठाकरे म्हणाले, "हा विझणारा पक्ष नाही तर विझवणारा पक्ष आहे."
राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली होती. "संजय राऊत हे राष्ट्रवादीचे आहेत की शिवसेनेचे हेच कळत नाही. यांची संपत्ती जप्त केली तर हे पत्रकार परिषदेतून शिव्या देत आहेत. परंतु, हे पत्रकार परिषदेत बोलताना कोणती भाषा वापरतात हे यांना तरी समजते का? असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. राज ठाकरे यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोजक्या शब्दात उत्तर दिले आहे.
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचीही नक्कल केली होती. नागानं फणा काढावा, असा त्यांचा चेहरा आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
"माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. हो माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. परंतु, जो मस्ती करेल त्याच्यासमोर फणा काढला जाईल. स्टॅंड अप कॉमेडियनच्या जागा खाली आहेत, त्या जागा राज ठाकरे यांनी घ्याव्यात, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे. जयंत पाटील यांनीही राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंनी स्टॅंड अप कॉमेडियनच्या जागा घ्याव्यात ; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
- शरद पवारांच्याकडे घेण्यासारखे अनेक गुण आहेत..,पण त्यांच्या जातीय राजकारणाचे काय करायचं?: राज ठाकरे
- Raj Thackeray : मशिदींच्या भोंग्यांना 3 मे पर्यंत मुदत, ऐकला नाहीत तर.., राज ठाकरेंचा इशारा
- Raj Thackeray : राज ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडीओ'; मशिदींच्या भोंग्यावर या आधीही आवाज उठवल्याचा दिला पुरावा