मुंबई : जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून दावे-प्रतिदावे करताना भाजप-सेना नेत्यांकडून एकमेकांची कानउघाडणी सुरुच आहे. जागावाटपाचं चित्रं रंगवणारे ते पेंटर असतील तर आम्ही कापायचं काम करणारे कारपेंटर आहोत अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. 2014 मध्ये जिंकलेल्या जागा कायम ठेवत युतीमधलं जागावाटप होईल, असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला होता, त्यालाचं उत्तर देताना संजय राऊतांनी नाव न घेता टीका केली आहे. मुंबईत एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलतं होते. युतीत 2014 ला जिंकलेल्या जागांवर चर्चा नाही, चर्चा फक्त सीटिंग व्यतिरिक्त उर्वरित जागांवर : चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील काय म्हणाले मला माहित नाही, पण ते म्हणाले 300 टक्के युती होणार मी बोलतो 550 टक्के युती होणार बोलतो. विधानसभेत जागा वाटप योग्य होईल, जे ठरलंय त्याप्रमाणेच होईल असं म्हणत महाराष्ट्रात मुंबईत काय आंकडा आणायचा आहे तो आम्ही आणूच असा सूचक इशारा राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना दिला आहे. BJP and Shiv Sena Alliance | चंद्रकांतदादा 'पेन्टर', शिवसेना 'कारपेन्टर', जागावाटपाचा फॉर्म्युला राऊतांचा टोला | ABP Majha अनेक लोकांना शिवसेनेचे विचार पटत आहेत. उध्दवजींच नेतृत्व मान्य आहे. त्यामुळेच अनेक लोकं शिवसेनेत येत आहेत, पण आणि सर्वांची पारख करुनच पक्षात घेत आहोत असं संजय राऊत म्हणाले. भाजपचं इनकमिंग बघता शिवसेनाला 144 जागा मिळतील का? या प्रश्नावर राऊतांनी हे फक्त माध्यमांना वाटतं, हे अंदाज तुम्हीच रंगवता असं म्हटलं. तसेच जागा वाटपातील मानाचं स्थान लिहायला बोलायला सोपं आहे. पण शिवसेना मानाच्या स्थानावर उभी असल्याचं राऊत म्हणाले. देशातील आर्थिक मंदीकडे, बेरोजगारीकडे सरकारचे लक्ष नाही : संजय राऊत