नवी मुंबई : माजी आमदारआणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अखेर शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र पाटील यांनी लोकसभेची निवडणूक सातारा मतदार संघातून शिवसेना उमेदवार म्हणून लढवली होती आज माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या जयंती निमित्त घेतलेल्या कार्यक्रमात नरेंद्र पाटील यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली आहे.


महाविकास आघाडीचे सरकार येवून दीड वर्ष होत आले, तरी माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोडविलेले नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे बैठकीबाबत वेळ मागूनही ते भेटत नाहीत. यामुळे आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी जाहीर केलं.


विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आपले जिव्हाळ्याचे संबंध असून ते शिवसेना नेत्यांच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मी शिवसेनेत राहू नये अशीच पक्षातील नेत्यांची इच्छा असल्याने आपण नाईलाजास्तव शिवसेना सोडत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.


Narendra Patil UNCUT | माझ्यासाठी माझे मराठा आणि माथाडी पहिले : नरेंद्र पाटील यांचं भाषण


नरेंद्र पाटील-उदयनराजे यांची गळाभेट


माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला नुकताच रामराम ठोकत असल्याचे सांगितलं आहे. असं असलं तरी दोन दिवसापूर्वी उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांच्या गळाभेटीचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल होताना पहायला मिळत आहे.  उदयनराजे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची पुणे- बंगळुरू मार्गावर समोरासमोर भेट झाली. या भेटीवेळी नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना पहात ‘साहेब मुख्यमंत्री होणार आहेत’ असं आनंदात सांगत उदयनराजेंना कडकडून मिठी मारली. नरेंद्र पाटिला यांचा निरोप एकूण उदयनराजेंनी देखील नरेंद्र पाटील यांना पुन्हा मिठीत घेतलं. दोन दिवसापुर्वीचा हा व्हायरल व्हिडिओ म्हणजे म्हणजे नरेंद्र पाटील यांचं शिवसेना सोडण्याचा अगोदरच सगळ ठरल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.


कोण आहेत नरेंद्र पाटील?

माथाडी कामगारांचे नेते म्हणून परिचित

नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार संघटनेचे नेते आणि संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र आहेत.

नरेंद्र पाटील हे विधानसभा सदस्यांनी निवडून दिलेले आमदार होते.


शिवसेनेकडून सातारा मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती.           


गेल्या काही दिवसांपासून ते भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.