मुंबई :  सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.  


"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तत्काळ कोरोना चाचणी करावी, असे आवाहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 






राजकीय व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात 
गेल्या आठ-दहा दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याबरोबरच राज्यातील नेते मंडळींनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपण्याच्या शेवटच्य दिवशी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही कोरोनाची लागण झाल्याची त्यांनी माहिती दिली आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 


कोरोनाचे नियम पाळण्याची गरज
देशासह राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सतर्कता बाळगली  जात आहे. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहात लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्याबरोबरच कोरोनाच्या नियमावलीमध्ये वाढ करण्यात आले आहेत. कोरोनाची तिसरी लाट टाळायची असेल तर सर्वांनीच कोरनाच्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे आवाहन प्रशासन करत आहे. 


महत्वाच्या बातम्या