रत्नागिरी : चंद्रकांत पाटलांच्या वैधानिक अभ्यासाबद्दल न बोललेचं बरं, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे.  विधानसभेच्या अध्यक्षांची निवड अशीच गुप्त पद्धतीने घ्यावी, तिथेही महाविकास आघाडीचा पराभव होईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांना मला एवढच सांगायच आहे की, विधानसभा किंवा राज्यसभा अध्यक्ष असतील यांची निवड घेण्याची एक प्रक्रिया आहे. विधानसभेचा अध्यक्ष कोण करावा हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा असल्याचेही भास्कर जाधव म्हणाले.



विधानसभा किंवा राज्यसभा अध्यक्षांच्या निवडीची वैधानिक प्रक्रिया चंद्रकांत पाटील यांना माहित नाही, याचं मला आश्चर्य वाटत असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदी तुमची निवड होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, की निवड करण्याचे सर्वस्वी अधिकार हे मुख्यमंत्री व महाविकास आघाडीच्या नेत्यांना असल्याचे ते म्हणाले. रत्निगीरीमध्ये भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 



काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?


सर्वसामान्य लोकांप्रमाणेच महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी देखील या सरकारला कंटाळले आहेत.  त्यांना गुप्त मतदानाची संधी मिळताच नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम या विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपला मतदान केल्याचे पाटील म्हणाले होते.
हिंमत असेल तर महाविकास आघाडी सरकारने विधानसभा अध्यक्षाची निवडणूक गुप्त मतदानाने घ्यावी, असे आव्हान  चंद्रकात पाटील यांनी दिले आहे. आघाडीला आपल्याच आमदारांची खात्री नसल्याने नियम बदलून आवाजी  मतदानाने निवडणूक करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे पाटील म्हणाले. सदस्य म्हणून अपात्र ठरण्याच्या भितीने लोकप्रतिनीधी त्या त्या पक्षासोबत राहत आहेत.  मात्र, गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भाजपला मतदान करतात केल्याचे पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला भास्कर जाधव यांनी प्रतिक्रियी देत  विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सांगितली आहे.