मुंबई :  शिंदे गटात सहभागी झालेले शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या गौप्यस्फोटावर शिवसेनेचे नेत अरविंद सावंत यांनी उत्तर दिलं आहे. "अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळावा अशी उद्धव ठाकरे यांची पहिल्यासून भूमिका होती. मी मंत्री असताना याबाबत  नितीन गडकरी यांच्यासोबत देखील बोललो होतो. परंतु, गडकरी यांनी देखील त्यावेळी सांगितले की मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देता येणार नाही. परंतु, एखादं- दुसरं मंत्रीपद वाढवून देण्यात येईल असं नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं, असं प्रत्युत्तर अरविंद सावंत यांनी राहुल शेवाळे यांना दिलं आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना युतीबाबत 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक तास चर्चा केली होती. शिवाय उद्धव ठाकरे यांची देखील भाजपसोबत युती करण्याची इच्छा होती असा गोप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला आहे. यावर बोलताना अरविंद सावंत म्हणाले, "खोटं बोलून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. ईडीच्या भीतीने हे भाजपसोबत गेले आहेत हे जनतेला माहिती आहे. ज्यांनी गेल्या अडीच वर्षांपासून उद्धव ठाकरे यांना सतावलं,  आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. एवढचं नाही तर आदित्य ठाकरे यांना  जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आले. त्याची उत्तरे या सर्वांनी द्यावीत. अर्वाच्य शब्दात आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला त्यावेळी हे सर्व जण कोठे गेले होते?  

युतीवरून 2019 ला राज्यात संघर्ष वाढला त्यावेळी अमित शाह महाराष्ट्रात आले नाहीत तर ते राजस्थानला गेले. उद्धव ठाकरे यांना काय शब्द दिला होता हे सांगाययला  त्यावेळी ते महाराष्ट्रात आले नाहीत. अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना काय शब्द दिला हे  त्याचवेळी हे सांगितले असते तर तेव्हाच युती झाली असती.  परंतु, त्यांनी तसं का केलं नाही?  याचं उत्तर राहुल शेवाळे यांनी द्यावे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. 

अरविंद सावंत म्हणाले, "2019 ला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी केली. त्यानंतर आम्ही एनडीएसोबत नाही हे कृतीतून सिद्द केलं होत. एनडीएच्या एकाही बैठकीला आम्ही गेलो नाही. त्यामुळे गेल्या अडीच वर्षात आम्ही एनडीएसोबत नव्हतो आणि पुढेही नसणार आहे. 

महत्वाच्या बातम्या

मी माझ्या परीने युतीसाठी प्रयत्न केले, आता तुम्ही तुमच्या पातळीवर करा, शिवसेना पक्षप्रमुखांनी युतीसाठी दिला होता ग्रीन सिग्नल; राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट