CM Eknath Shinde Speech: शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून कार्यक्रम घेण्यात आला. शिंदे गटाकडून गोरेगाव येथील नेस्को संकुलातील कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जवळपास तासभराच्या भाषणात ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे...
- गेल्या वर्षी 20 तारखेला क्रांतीला सुरुवात केली
- हा वर्धापन दिन आपल्यासाठी ऐतिहासिक आहे, गौरवाचा आहे
- आम्ही आम्हाला टिकेला उत्तर कामाने देणार
- शिवसेनेच्या नेत्यांच्या कामातून , घामातून शिवसेना उभी राहिली आहे. त्यांच्यावर टीका करत आहात.
- मी शिवसेनेसाठी मेहनत घेतली, कुटुंबाची पर्वा केली नाही
- लोकसभेची निवडणूक होती...त्यावेळी आई रुग्णालयात होती...त्यावेळी प्रचार केला.. तिचं निधन झाल्याचं समजलं तेव्हाही पक्षाचे काम करत होतो...
- किती तरी लोकांचे जीव गेलेत, तुरुगांत गेलेत ते या शिवसेनेसाठी
- जेव्हा वाघ डरकाळी फोडत नाही तोपर्यंत तुमची कोल्हेकुई सुरू राहणार. वाघ डरकाळी फोडतो तेव्हा कुठे पळतात हे सर्वांना माहिती आहे.
- मी काल ही कार्यकर्ता होतो, आज ही आणि उद्या ही कार्यकर्ता म्हणून काम करणार
- तुम्ही सत्तेसाठी बाळासाहेंबाचे विचार सोडले. शिवसेना, धन्युष्यबाण तुम्ही गहाण टाकला होता तो सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला.
- एक दिवस तुमचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही
- आपल्याला निवडणूक आयोगाने शिवसेना अधिकृतपणे दिलाय. सुप्रीम कोर्टानाही निकाल दिला आहे.
- आता तुमच्या खोटारडेपणाला जनता साथ देणार नाही.
- अगोदरचा मुख्यमंत्री पेन ठेवत नव्हता. माझ्याकडे सह्या करण्यासाठी 2 -2 पेन ठेवले आहेत.
- मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अडीच वर्षात दोन कोटी वाटले... मी 11 महिन्यात 75 कोटी वाटले...
- मनोहर जोशींचा अपमान तुम्ही केला... त्यांना भर सभेत अपमान करून त्यांना उतरवून लावले... असा अपमान पक्षप्रमुख करतो का....रामदास कदम यांच्यासोबतही तसेच होणार होते. त्यावेळी त्यांना सावध केल्याने दसरा मेळाव्यात आले नाहीत.
- पक्ष वाढवत असताना सगळ्यांना सोबत घ्यावं...काही चुकलं तर बसून चर्चा करावी लागते...कार्यकर्ते मोठे करा असं त्यांना सांगायचो पण त्यांना दरबारी राजकारणी हवे होते...
- एवढे लोक सोडून चालले त्याचं आत्मपरीक्षण करा
- जास्त बोलत नाही तर सगळे खोके बाहेर येतील... खोके कुठं गेले हे जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही...
- कोरोना काळातील हिशोब तुम्हाला द्यावा लागेल...
- एक नोटीस आली तर मोदी शाह यांच्याकडे धावत गेले....
- बाळासाहेबांची पुण्याई आहे....पण तुम्ही आपल्या मर्यादेत राहा
- मणिपूर काय? मोदींनी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला.