जळगाव  :  जळगावमधील सभेला परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे  (Sushma Andhare) आक्रमक झाल्या आहेत. "मी काही आतंकवादी नाही किंवा दहशतवादी नाही. माझ्या कारच्या पुढे 500 पोलिसांचा गराडा आहे. पोलिस मला काय जीवे तर मारणार नाही ना असा प्रश्न उउपस्थित करत सुषमा अंधारे यांनी  शिंदे सरकारसह जळगाव जिल्हा प्रशासनावर टीका केली आहे.  


जळगाव मध्ये आज सुषमा अंधारे यांची सभा होती. परंतु, त्यांच्या सभेला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारण्यात आली. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी सभा घेण्यावर सुषमा अंधारे ठाम आहेत. त्यामुळे त्यांना आता नजर कैद करण्यात आले आहे. सुषमा अंधारे यांना पोलिसांनी जळगावमधील हॉटेल के पी प्राईडमध्ये नजर कैद केले आहे. मुक्ताईनगर येथे महाप्रबोधन सभेला परवानगी नाकारल्यानंतरही सभा घेणारच असा पवित्रा ठाकरे गटाने घेतल्याने जळगाव वरून मुक्ताईनगरकडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी सुषमा अंधारे यांना नजरकैद केले. साध्या वेशाततील पोलिस आणि महिला पोलिसांचा हॉटेलबाहेर गराडा आहे.  


प्रथम सभेला परवानगी नाकारली आणि त्यानंतर नजर कैद करण्यात आले. त्यामुळे सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. "मी काही आतंकवादी नाही किंवा दहशतवादी नाही. पोलिस मला जीवे तर मारणार नाहीत ना? खासगी मालमत्ता असलेल्या ठिकाणीही 300 ते 400 पोलिसांचा गराडा पडलेला आहे. मी संविधानिक विचार मांडते, तरीही तुम्ही घाबरता कशाला? असा सवाल उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी सरकारच्या या कारभारावर ताशेरे ओडले आहेत. मी जळगाव जिल्ह्यातले प्रश्न मांडत असेल तर माझा जीव घेणार का? मी सर्व गोष्टींना तयार असल्याचा इशाराही सुषमा अंधारे यांनी यावेळी सरकारला दिला आहे.


जळगावमधील मुक्ताईनगर येथील सुषमा अंधारे यांच्या सभेवर आज जिल्हा प्रशासनाने बंदी घातल्यानंतर जिल्ह्यातल्या राजकारण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे मुक्ताई नगरातील 20 ते 25 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आता सुषमा अंधारे यांना नजर कैद केल्यामुळे त्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. 


जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्ताने सुषमा अंधारे यांच्या सभा होत आहेत. यादरम्यान धरणगाव येथील सभेत मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याबद्दल युवासेनेचे राज्यविस्तारक शरद कोळी यांना प्रशासनाकडून जिल्हा बंदी करण्यात आली आहे. आता आज मुक्ताईनगर येथे होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेच्या सुषमा अंधारे यांच्या सभेवरही जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे, याबाबतचे आदेश प्रशासनाने पारित केले आहेत. सुषमा अंधारे यांची सभा रद्द झाल्याच्या प्रशासनाच्या या निर्णयाने खळबळ उडाली आहे.


दरम्यान, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केलीय. या देशात जो कोणी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो त्याचा आवाज दाबाण्याचा प्रयत्य केला जातोय. महिलांना छळलं जात आहे. आधी ऋतुजा लटके, किरोशी पेडणेकर आणि आता सुषमा अंधारे यांना छळण्याचा प्रयत्न केला जात आहे.