मुंबई : 17 डिसेंबर रोजी महाराष्ट्रद्रोही लोकांच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. सातत्याने महाराष्ट्राचा अपमान केला जात आहे. महाराष्ट्राचं अस्तित्व नाकारलं जातयंय, महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगून महाराष्ट्र तोडला जातोय. महाराष्ट्रातून उद्योग पळवून नेले जात आहेत. या सर्वांच्या विरोधात मुंबईतील जिजामाता उद्यानापासून विराट मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackera) यानी दिली.
17 डिसेंबंरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची बैठक पार पाडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद (Mahavikas Aghadi leaders pc ) घेतली. यावेळी 17 डिसेंबरच्या मोर्चाबाबत माहिती देण्यात आली.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. "गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले उद्योग कारणीभूत आहेत. कर्नाटक निवडणूक समोर ठेऊन आता महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतं आहे. महाराष्ट्र प्रेमी आहेत त्या सर्वांना आम्ही मोर्चासाठी बोलवलं आहे. मराठी भाषिकांवर अजुनही कानडी अत्याचार सुरू आहेत. महाराष्ट्रातील वाहनांना काळे फासले जात आहे. परंतु, अशा परिस्थितीत महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, नेता नाही अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रानेचे नेहमी संयम पाळायचा का? राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी संसदेत याविरोधात आवाज उठवला. मात्र बाकीचे खासदार कुठे होते? असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
Mahavikas Aghadi leaders pc : देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर
दरम्यान, गुजरात निवडणुकीतील विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन करताना भाजपला टोला लगावला होता. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला देखील उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. "त्यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते अशी उत्तरं देत आहेत. संजय राऊत यांना उघड उघड धमक्या देत आहेत. तरी देखील आम्ही शांत बसायचं का?. आम्ही नेहमी जनते सोबत आहोत. नाणार येथील जनेतचा विरोध होत असल्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत होतो. वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्रात पाठवत आहेत. नाणार प्रकल्प तिथ नको असं म्हणणं होतं, मात्र दुसरीकडे प्रकल्प उभारण्यासाठी आमची अडचण नव्हती, यावर त्यांनी बोलावं, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Mahavikas Aghadi leaders pc : सीमावादावरून अजित पवारांचा राज्य सरकारला टोला
"एकीकडे शांततेचं आवाहन करतात आणि दुसरीकडे भडका उठेल अशा बाबी घडत आहेत. कन्नड वेदिका संघटनेचे कार्यकर्ते हम करे सो कायदा असं वागत आहेत. वर्षानुवर्ष तिथली गावे महाराष्ट्रात येण्यासाठी इच्छुक आहेत. लोकसभेचे अध्यक्ष म्हणतात की दोन्ही राज्यांनी प्रश्न सोडवावा. मात्र हे शक्य नाही, केंद्राने हा प्रश्न सोडवणे गरजेचं आहे. त्यामुळे हल्लाबोल आम्ही आंदोलन पुकरालं आहे. आमच्या कार्यकाळात कधीच सीमाभागाचा विषय आला नाही. आता ही भावना त्या लोकांच्या मनात निर्माण होण्याला हे सरकार जबाबदार आहे. हे कमी पडले आहेत. परंतु, हे मान्य करत नाहीत, असा टोला अजित पवारांनी लगावलाय.