Shiv Sena : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाकडून  संपर्क प्रमुख म्हणून दिग्गजांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार-खासदार मैदानात उतरणार आहेत. निवडणुका होईपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे निर्देश संपर्क प्रमुखांना पक्ष नेतृत्वाने दिले आहेत. खासदार नरेश म्हस्के यांना ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

Continues below advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडून एकूण 40 ठिकाणी जिल्हा संपर्क प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरेंकडून याबाबतचे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. काही ठिकाणी गरपंचायतीच्या आणि नगरपरिषदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर काही ठिकाणी अनेक नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. अनेक ठिकाणी जोरदार लढती असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख यादी

1. सिंधुदुर्ग – 1) श्री. किरण पावसकर                         2) श्री. राजेश मोरे2. रत्नागिरी -   श्री. यशवंत जाधव3. रायगड ग्रामीण - श्री. संजय घाडी4. नवी मुंबई शहर -  श्री. नरेश म्हस्के5. पालघर - श्री. रवींद्र फाटक6. ठाणे ग्रामीण - श्री. प्रकाश पाटील7. ठाणे शहर -  श्री. नरेश म्हस्के8. पुणे - श्री. नरेश म्हस्के9. पिंपरी चिंचवड शहर - श्री. सिद्धेश कदम10. पुणे ग्रामीण – 1) श्री. श्रीरंग आप्पा बारणे                             2) श्री. रामभाऊ रेपाळे11. सातारा -  श्री. शरद कणसे12. सांगली - श्री. राजेश क्षीरसागर13. कोल्हापूर – 1) श्री. धैर्यशील माने                           2) श्री. संजय मंडलिक14. सोलापूर -  श्री. संजय कदम15. नाशिक लोकसभा  - श्री. रामभाऊ रेपाळे16. दिंडोरी लोकसभा  - 1) श्री. रामभाऊ रेपाळे                                       2) श्री. भाऊसाहेब चौधरी17. जळगाव-  श्री. सुनिल चौधरी18. दुरबार - श्री. राजेंद्र गावित19. धुळे - श्री. मंजुळा गावित20. छत्रपती संभाजीनगर महानगर - श्री. विलास पारकर21. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण - श्री. अर्जुन खोतकर22. जालना -  1) श्री. अर्जुन खोतकर                      2) श्री. भास्कर आंबेकर23. बीड – 1) श्री. टी. पी मुंडे                    2) श्री. मनोज शिंदे24. धाराशीव - श्री. राजन साळवी25. नांदेड - श्री. सिद्धराम म्हेत्रे26. लातूर - श्री. किशोर दराडे27. बुलढाणा - श्री. हेमंत पाटील28. परभणी - श्री.आनंद जाधव29. नागपूर ग्रामीण- श्री. दिपक सावंत30. नागपूर शहर - श्री. दिपक सावंत31. गडचिरोली – 1) श्री. दिपक सावंत                             2) श्री.किरण पांडव32. भंडारा - श्री. गोपीकिशन बाजोरिया33. अमरावती - श्री. नरेंद्र भोंडेकर34. वर्धा - श्री. राजेंद्र साप्ते 35. यवतमाळ - श्री. हेमंत गोडसे36. वाशिम - श्री. जगदीश गुप्ता37. हिंगोली - श्री. हेमंत पाटील38. अकोला - श्री. अभिजित अडसूळ39. चंद्रपूर - श्री. किरण पांडव40. अहिल्यानगर -श्री. विजय चौघुले

Continues below advertisement