सातारा : छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या गाथा सांगणाऱ्या दिवसामधील एक दिवस म्हणजे प्रतापगडावरील अफजल खानाचा केलेला वध. हा दिवस मोठ्या उत्साहात शिव प्रताप दिन (Shiv Pratap Din) म्हणून साजरा केला जातो. आज या दिवसाला 353 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने प्रतापगडावरती प्रशासकीय यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवप्रताप दिनादिवशी शिवभक्त मोठ्या प्रमाणात प्रताप गडावरती माथा टेकण्यासाठी येत असतात. 


मात्र कोरोना आणि नव्याने आलेला ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या निर्बंधांमुळे गडावरती शिवप्रेमींना बंदी घालण्यात आली. सोबतच 144 कलम हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे साध्या पध्दतीने गडावरचा हा उत्सव शासकीय यंत्रणेने पारा पाडला. 


नेहमीप्रमाणे सकाळी गडावरील देवीच्या मंदिरात प्रथम पूजा करण्यात आली. गडावरच्या शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक मंदिरातून निघाली. नंतर गडावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. 


यंदाच्या शिवप्रताप दिनानिमित्त कोणताही ढोल ताशा लावण्यात आला नव्हता. तसेच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात आली नाही. जरी शिवप्रेमींना या ठिकाणी येण्यास मज्जाव केलेला असला तरी प्रशासकीय यंत्रणेने मात्र हा उत्सव चांगला पार पाडला.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha